Welcome ज़िंदगी – १०

slide10.001

‘FRIENDSHIP AND RELATIONSHIP’

How should relationships be?

Simple, straightforward, with mutual understanding, mutual listening, mutual speaking. The transparency between the two should be pleasing, maturing and enriching to each other.

It is a fact that the bliss that one gets out of a relationship is the best. This is a proven truth now. In other words, if you want to be happy and contented your relationships should be good.

Do we make them easy?

No,

Human relationships are very complex. Suddenly something goes wrong and a relationship that is going on smoothly for years takes a jolt creating a rift between the two persons. Sometimes the relationship is patched up again; sometimes the rift becomes an abyss leading to enmity. Both swear of not even looking at each other. This happens between siblings, between parents and children. Funnily enough there is actually no strong reason for the rift or enmity to exist! Can blood relations be like this? Why does a son who depended totally on his mother, whose mother was his whole world in the childhood finds it difficult to adjust with her as he grows up? Lovers are ready to bring the moon to the earth for the partner before marriage find out that they are not suitable to each other after marriage; why? The relationships of a mother and daughter-in-law and sisters- in-law are almost of enemies; why?

Plenty of examples can be cited of this kind of relationships.

 

Why is it the case?

The answer is, we really don’t know how to mend it.

Relations should not be clingy or entangled.

They should not be suffocating.

There should be openness where

Everybody can breathe freely according to their own style.

Everybody has his own thoughts and standpoint, perspective of life; he thinks that they are the right ones. So much so that he can’t even accept that others can have different opinions or thoughts. Similarly, relationships are taken for granted and that creates distances.

 

Misunderstandings, expectations, taking for granted, ‘only I am right’ kind of attitude, undue large ego are some of the causes of distances between relations. Using disrespectful language about others, being unforgiving, deception, betrayal, to malign others, not having control over emotions are some other reasons that cause distancing relations. As a result, you tend to reject the relationship.

But this does not happen in a friendship. Two siblings may not get along with each other but individually they could be the best friends of others. It can happen in a parent-child relation. A son who doesn’t get along with his parents may have very good friendly relation with a senior person in the society.

Then, are we to say that relations are troublesome and friendships are pleasing? We have a saying that once a son fits into your shoes he is like your friend. Why not use the same principle in all relationships?

What is a ‘friendship’? What is its definition?

● Friendship is an emotion/ feeling that can’t really be put into words.

● A complex and beautiful coalition of various emotions is friendship.

● When any two individuals are bonded together with mutual understanding, love and respect it is friendship. Friendship does not depend on one’s age, caste, religion or sex.

● Cicero, a Roman thinker, says, ‘Friendship makes prosperity brighter, while it lightens adversity by sharing its grieves and anxieties.’

● Friendship is the inexpressible comfort of feeling safe with a person, having neither to weigh thoughts nor measure words- this can be a definition of friendship.

● Friendship means… … can’t really tell! When you enter into a friendship you automatically understand its meaning. Friendship can happen in no time but you have to give it some time to stand on the solid foundation of trust. That is a testing period for both the partners.

There are no expectations, and the friend is not taken for granted in a good friendship. This can be applied to relationship in general. All you have to do is to accumulate all the aspects of friendship in a relationship.

Accept, cultivate, and preserve a relation like it is friendship. Husbands and wives can become good friends; their coexistence then becomes melodious.

If the bond between brothers or sisters is strong we easily say, ‘he is my brother but we are thick friends rather than siblings.’

 

Or we introduce a close friend, ‘he is like my elder brother.’

Similarly we use phrases like ‘he is like my father’ for an elderly advisor. A daughter-in-law may say, ‘my mother-in-law is like my friend.’

‘We sisters-in-laws stay like friends.’

‘My elder brother-in-law is like a brother to me.’

‘My father-in-law understands me like a friend.’

When a friend helps us in difficult situations we say, ‘you supported me like a brother.’

It means that when a friend helps us we assume a relation with him/her and we name a relation as ‘friendship’ that makes us happy.

That is why friendship should not be based on selfishness or motives/ intentions; it should be based on thick relationship; there should be thick friendship in close relationships. Wouldn’t that be wonderful! Then we will not have to look for happiness and satisfaction, it will be there with us.

Pratibha

(Translation is done by my friend)


मैत्री आणि नातं

नाती कशी हवीत? सोपी, साधी, सरळ, एकमेकांना समजून घेणारी, दुसऱ्याचं म्हणणं आपण ऐकायचं आणि समजून घ्यायचं, आपलं म्हणणं त्याला सांगायचं,  त्यानं समजून घ्यायचं. दोघांमधला पारदर्शीपणा दोघांनाही सुखावणारा, परिपक्व करणारा.

सुखाच्या आणि आनंदाच्या सगळ्यात वरच्या पायरीवर, नात्यांपासून मिळणारा आनंद विराजमान झाला आहे. हे सत्य आता सिद्ध झालंय. म्हणजेच समाधान, सुख हवं असेल तर नातेसंबंध चांगलेच हवेत.

पण आपण ती इतकी सोपी करतो का?

मानवी नातेसंबंध ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे सुरळीत चाललेल्या संबंधात अचानक काही विकल्प येतो आणि दुरावा निर्माण होतो. कधीतरी ही नाती परत जोडली जातात, तर काही वेळा अगदी विकोपाला जातात. एकमेकांची तोंडं बघण्याची शपथही खुपदा घेतली जाते. अगदी भावाभावांत, भाऊ-बहिण किंवा आई-वडील आणि मुलं यांच्यात असं होत आणि गंमत म्हणजे कुठल्या कारणाने दुरावा किंवा वितुष्ट निर्माण झालं याचं सबळ असं कारणही नसतं आणि मग वाटतं रक्ताची नाती अशी खरंच असू शकतात ? लहानपणी आईशिवाय दुसरं जग नाही, आईशिवाय पानही हलत नाही, असं म्हणणाऱ्या मुलांना मोठेपणी आईशी जुळवून घ्यायला जड का जात? लग्नाच्या आधीचे प्रियकर-प्रेयसी लग्नाआधी चंद्र, तारे तोडून आणण्यासाठी तयार असणारे, एकदा लग्न झालं की त्यांना, आपण एकमेकांसाठी योग्य नाही, असं वाटायला लागतं

सासू-सून, नणंद-भावजय या नात्यांकडे वैरभाव म्हणून का बघितलं जातं ?

अशी कित्येक उदाहरणं देता येतील.

हे असं का ?

या प्रश्नाला उत्तर एकच –

जसं, भाकरी का करपते ? घोडा का बसला ? गाडा का अडला ? याला उत्तर एकच, न फिरवल्यामुळे.

तसच नाती का बिघडतात? याला उत्तर एकच, ‘नाती टिकवायची कशी?’ हे माहित नसल्यामुळे.

Relations should not be clingy or entangled.

They should not be suffocating.

There should be openness where everybody

can breathe freely according to their own style.

प्रत्येक जीवनाकडे बघण्याची एक भूमिका असते, विचार असतात आणि गंमत म्हणजे त्याला तेच योग्य वाटत असतात; इतके की दुसऱ्यांची काही वेगळी मतं, वेगळे विचार असू शकतात हेही त्यांना मान्य नसतं. नात्याला गृहीत धरल जात आणि म्हणूनच नात्यात दुरावा निर्माण होत असतो.

गैरसमज, अपेक्षा, गृहीत धरणं, आपलच म्हणणं योग्य, मीच बरोबर, वाजवीपेक्षा मोठा अहंकार, अहंभाव अशा कितीतरी बाबी नाती दुरावायला कारणीभूत होतात.

कोणाहीविषयी अनादराने बोलणे, क्षमाशील नसणे, प्रतारणा करणे, दुसऱ्याची बदनामी करणे, स्वतःच्या भावनांवर ताबा ण मिळवणे याही गोष्टी नात्यात दुरावा आणायला कारणीभूत होतात आणि पर्यायाने नाती नकोशी वाटतात.

पण, गमत म्हणजे मैत्रीत असं नसत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. दोन भाऊ, दोन बहिणी किंवा भाऊ आणि बहिण यांचं एकमेकांशी जरासुद्धा पटत नाही, पण वैयक्तिकरित्या ते आपापल्या मित्रांत एक उत्तम मित्र म्हणून ओळखले जातात. आई-वडील आणि मुलांच्या नात्यात सुद्धा असं होऊ शकतं. मोठेपणी आई-वडिलांशी अजिबात संबंध न ठेवलेला मुलगा समाजातल्या ज्येष्ठ व्यक्तींशी मैत्री बाळगून असतो.

तर मग असं म्हणायचं का, की नाती त्रासदायक आणि मैत्री हवीशी वाटणारी?

नाहीतरी आपल्याकडे म्हणतातच की, आपल्या बुटात मुलाचा पाय जायला लागला की, त्याचं मित्र व्हायचं. मग हेच सूत्र सगळ्या नात्यांत वापरायचं.

पण नेमक सांगता येईल का,

मैत्री म्हणजे काय ? त्याची व्याख्या काय ?

शब्दांत सांगता येणार नाही, अशी भावना म्हणजे मैत्री.

सुंदर आणि गुंतागुंतीच्या भावनांचा संगम म्हणजे मैत्री.

जेव्हा दोन माणसं एका परस्पर सामंजस्याने, प्रेमाने, आदराने, एकत्र बांधली जातात त्याला मैत्री म्हणतात. मैत्री ही वयावर, जातीवर, धर्मावर, लिंगावर अवलंबून नसते.

रोमन विचारवंत सिसेरो (Cicero) म्हणतो, Friendship makes prosperity brighter, While it lightens adversity by sharing its griefs and anxieties.

मैत्रीची व्याख्या अशीही करता येईल की, Friendship is the inexpressible comfort of feeling safe with a person, having neither to weigh thoughts nor measure words.

मैत्री म्हणजे…नाही सांगता येत. मैत्री जेव्हा होते तेव्हा याचं उत्तर आपोआपच मिळतं. मैत्री लगेच होऊ शकते, पण ती विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राह्यला थोडा काळ जावा लागतो. त्या काळात दोन्ही मित्रांची कसोटी असते.

चांगल्या मैत्रीत अपेक्षा नसते, मित्राला गृहीत धरण नसतं, तर मग हे सर्व पैलू नात्यालाही लागू करता येतील. करायचं फक्त इतकच की मैत्रीचे पैलू नात्यात स्वीकारायचे.

नातं, मैत्रीसारखं स्वीकारायचं, जोपासायचं, जतन करायचं. नवरा बायको उत्तम मित्र होऊ शकतात आणि असं झालं तर ते सहजीवन हे सुरेल होतं.

दोन भावांची, दोन बहिणींची वीण घट्ट असेल तर ओळख करून देताना आपण म्हणतोच की, हा माझा भाऊ (बहिण) त्यापेक्षा आम्ही घट्ट मित्र (मैत्रिणी) आहोत.

किंवा एखाद्या घट्ट मित्राची (मैत्रिणीची) ओळख आपण अशीही करून देतो, ‘हा माझा मित्र(मैत्रीणी) मला अगदी मोठ्या भावासारखा आहे.’ किंवा आपल्याला वडिलकीच्या नात्याने सल्ला देणाऱ्या ज्येष्ठ गृहस्थांची ओळख आपण करून देतो. ‘हे मला अगदी वडिलांसारखे आहेत.’ किंवा एखादी सून असंही म्हणते, ‘माझ्या सासूबाई मला मैत्रीणीसारख्या वाटतात.’

‘आम्ही दोघी नणंदा, भावजया अगदी मैत्रीणीसारख्या राहतो.’

‘आम्हा जावा-जावांचं नातं मैत्रीचं आहे’.

‘माझा मोठा दीर मला भावा सारखा आहे.’

‘माझे सासरे मला समजून घेतात, जसा माझा मित्र मला समजून घेईल.’

आपल्याला कोणी मित्राने मदत केली, तर आपण म्हणतो,

‘माझ्या भावासारखा माझ्यामागे संकटात उभा राहिलास.’

म्हणजे मित्राने जरी मदत केली तरी आपण त्यात नातं गृहीत धरतो आणि जे नातं आपल्याला सुखकर असतं, त्यात आपल्याला मैत्रीची जाणीव होते.

म्हणूनच मैत्री हा स्वार्थ किंवा हेतू यावर नाही, तर घट्ट नातेसंबंधांवर आधारित असावी; तसेच नातेसंबंधात घट्ट मैत्री हवी. असं झालं तर काय बहार येईल! सुख, समाधान शोधायला लागणार नाही, ते असेलच आपल्याजवळ.

प्रतिभा

Welcome ज़िंदगी – ९

Screen Shot 2018-03-23 at 4.08.22 PM

Barve Ajoba (Grandpa)

I was sitting quietly on the floor with closed eyes. There was the Bhagvadgita in front of me. After a two minute meditation I started reading the first shloka of the chapter.

This was my new year’s resolution. So far I have gathered knowledge of various subjects- science and the external world around me. But what about the internal world? There is also an inner world and it is entirely under my control. Whatever I am today is due to all the nurture and inculcation, various influences, and my own understanding and interpretation of my surroundings. So I am responsible for what I am. But I had completely forgotten that I have control over myself and that the pleasure and pain arising out of the dominion or control was mine. So far the journey had been effortless, natural.

These days I am aware of two things.

I started studying psychology and realized that there is an option available for me to shape myself the way I want to; this was the first thing that I understood.

The second thing was that our ancestors have said a lot about these things in the Rigveda, Samaveda, Yajurveda, Atharvaveda, Upanishads, the Gita, Dnyaneshwari, all the literature of the saints and many more texts. The list is quite long.

Then I felt that I should also peep into these for an understanding of my inner world.

This was not my first time to make a new year’s resolution. In childhood it was a yearly custom. After declaring the resolution to a few friends and the family it would be dissolved till the 4th or 5th of January! If the resolution was a favourite one, it lasted till the 15th or 16th! But afterwards it was mostly forgotten.

This resolution was different because now I am in my sixties and there is a kind of inner compulsion to know.

 

Once a reader asked me whether I studied the saint-literature. Out of emberassment I avoided the question. Then I thought being student of psychology I should not only read the literature but study and internalize it. That will help in knowing if I am falling short of anything in the inner world. I wanted my thoughts to be taller.

There is a special place to the Gita in every Indian’s mind. Therefore I decided to begin from the Gita.

On the 1st of January this thought was actualized.

As I went ahead with reading and understanding it I was amazed. For all these years this treasure of knowledge was at hand, why did I wait till crossing the sixties to plunge into it?

 

It was the 10th of February. Right since morning I was feeling a bit apprehensive. It was my parents’ wedding anniversary but both were no more. Had they been alive they would have appreciated this resolution very much. They would have even joined me every day. My mother would have prepared shira as an offering. But that day there was something more to the apprehension than these thoughts.

On that special day I decided to take my parents along with me.

It was 4 in the afternoon. There was the Gita in front of me. After a few minutes of sitting silently I started getting waves of bliss from within. My parents and I were there but there was someone else as well. I could feel the existence and then my mind became quiet. The existence was of Barve Ajoba.

 

I was not in Pune at that moment, I was not 60 years old, and there was no Gita in front of me.

I was about 6, my brother was about 9 years old; we were staying in Girgaon, with my parents and Barve Ajoba. He was 80 years old then. My grandpa’s friend. He stayed at Kurla. He had two rooms in a chawl and his son, daughter-in-law and grandson stayed with him. We have never seen his wife. I think she had passed away long back.

When my grandpa came over from Guhagar for a few days, Barve Ajoba would also come and give him company. Sometimes he used to visit and stay with us for a few days even in the absence of my grandpa.

My mother would prepare all the traditional Konkan dishes of his liking. She felt that grandpa Barve would never ask his daughter-in-law to make those dishes. He called my father ‘Pursha’- short form of ‘Purushottam’ and my mother as ‘Sunbai’ (daughter-in-law).

 

For a few days we had a great feast in the house; we relished all the food that was prepared for him. He told us lots and lots of stories. He had a treasure of stories.

How did he teach us to recite the Gita?

My father told me after I grew up,

“One night Barve Ajoba told my parents, ‘I come here rightfully like its my own house. I am eagerly looking forward to this visit. It supplies me energy for the next six months. Sunbai pampers me like a child. Your children call me ‘grandpa’ and prance around me. I am very happy here, but I always have a small regret that I can’t extend the same hospitality to you.’”

“Please don’t think that way. Your stay here is a pleasure, contentment for us. And you tell the children wonderful stories; they love that.” My father said to him.

“I want to do something more for you but don’t know what!” This was his concern.
My mother was around, she said,

“My father-in-law told me that you have learnt the Gita by heart. Why dont you teach the same to our children?”

Grandpa Barve was extremely pleased with the suggestion.

“Best! I will teach the grandson but the granddaughter is too young to learn it. I will teach her after 3-4 years.”

From that day he started teaching the Gita to my brother. At first he taught him the 15th chapter.

Thereafter in each visit he taught one more chapter to my brother.

He used to be fully engrossed in teaching. I used to be around the doing something or the other.

I remember the day.

It was 4 in the afternoon.

My mother served him tea; milk to us.

My brother started reciting the 15th chapter. Suddenly he had to stop because he had a fit of coughing.

And,

I was playing with my doll and started reciting, picking up from where he had left.

“Great! This little one has by hearted the chapter only by listening to it. Good”.

From that day onwards I also joined my brother in his recitation.

And,

That day I felt Barve Ajoba’s existence once again!

Now I don’t remember the whole text of the Gita. But I am sincerely trying to live by it; grandpa Barve would have been very happy about that.

During the course of life we come across a number of people. We forget some of them for a while but they are not completely deleted from the mind. If we search in our memory trove we certainly find them.

These memories surely provide us strength to live on!

Pratibha

(Translation is done by my friend)


Screen Shot 2018-03-23 at 4.14.22 PM

बर्वे आजोबा

एक जानेवारी दोन हजार सोळा. वेळ दुपारी चार. मी मांडी घालून डोळे मिटून शांत बसलेली. समोर श्रीमद्भगवतगीता, अध्याय पहिला. दोन मिनिट ध्यान केल्यावर गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून वाचायला सुरवात केली.

हा माझा नवीन वर्षाचा संकल्प. आतापर्यंत ज्ञान घेतलं विविध विषयांच, विज्ञानाच, माझ्या सभोवतालीच्या जगाच. पण मग माझ्या आतल्या जगाच काय? माझ्या आतही एक जग आहे ज्याचा ताबा फक्त माझ्याकडे आहे. जशी जन्मले, जसे संस्कार झाले, जसा आजूबाजूच्या वातावरणाचा अर्थ स्वतःच्या कुवतीनुसार लावला तशी घडले त्याला जबाबदारही मीच. पण माझी माझ्यावर सत्ता, त्याच सुख: दु:ख माझ्याजवळ हे विसरूनच गेले. आत्तापर्यंतचा माझा प्रवास आपसूक घडला होता. पण हल्ली जाणीव होत होती दोन गोष्टींची.

पहिली म्हणजे मानस शास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर जाणवलं, मला हव तस स्वतःला घडवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

दुसरी जाणीव झाली, या बद्दल काय लिहून ठेवलंय आपल्या पूर्वजांनी. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, उपनिषद, गीता ज्ञानेश्वरी, संत वाड्गमय, आणि अजून बराच काही. सूची म्हणाल तेव्हढी लांबेल.

आयुष्यात नवीन वर्षाचा संकल्प करण्याची हे काही पहिली वेळ नव्हती. लहानपणी दर वर्षीचा हा प्रघात असायचा. संकल्प मैत्रीणीना, घराच्या वडील मंडळींना सांगून झाला की पाच-सहा तारखेपर्यंत विरून जायचा. फारच आवडलेला असला तर पंधरा- सोळा तारीख उजाडायची पण मग त्यानंतर त्या बद्दल विसरायलाच व्हायचं.

पण आताची मी बहुतेक तस करणार नव्हते कारण आता मी साठी पार केलेली आणि आतून ओढ लागली होती हे सर्व जाणून घ्यायची.

एकदा एका वाचकाने मला प्रश्न केला होता, संत वाड्गमयाचा अभ्यास तुम्ही कस केला. मी शरमेन उत्तर द्यायचं टाळाल होत. आता मात्र ठरवलं, जे विपुल साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ते नुसत वाचायचं नाही आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी. म्हणून त्याचा अभ्यास करून आत्मसात करायचं. जाणून घ्यायचं आपल्या आतल्या जगात आपण कुठे कमी पडतोय का? उंची वाढवायची आपल्या विचारांची.

श्रीमद्भगवत गीतेला भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे आणि म्हणून सुरवात करायची गीतेपासून.

एक जानेवारीला या विचारांना मुर्त्य स्वरूप आल.

जस जशी वाचत गेले, अर्थ समजायला लागला तशी चकित झाले. इतके दिवस होत की सगळ हाताशी, या ज्ञानात बुडण्यासाठी साठी पार व्हायची का वाट बघितली.

आज तारीख दहा फेब्रुवारी. उठल्यापासून कसली तरी हुरहूर लागली होती. आई-बाबांच्या लग्नाचा आज वाढदिवस पण आज दोघेही हयात नाहित. असते तर त्यांना हा संकल्प नक्कीच आवडला असता. रोज माझ्या समवेत येऊन बसले असते. आईने तर पहिल्या दिवशी प्रसादाला म्हणून शिराही केला असता. पण आजची हुरहूर नुसत्या या आठवणींमुळे नव्हती अजूनही काहीतरी मनात दाटून आल होत.

आजच्या विशेष दिवशी आई, आबांना आपल्या सोबत घ्यायचं ठरवलं.

वेळ दुपारची चार. माझ्या पुढे गीता. दोन मिनिट शांत बसल्यावर आतून आनंदाचे कढ यायला लागले. मी, आई, आबा म्हणजे माझे बाबा, होतेच तिथे पण अजूनही कोणीतरी होत. त्याचं अस्तित्व जाणवलं आणि मन शांत झाल. हे बर्वे आजोबा.

आता मी पुण्यात नव्हते, माझ वय साठ नव्हत माझ्या समोर गीताही नव्हती.

मी होते गिरगावात, वय सहा-सात, भवाच वय नऊ-दहा, आई, आबा, आणि सोबत ऐशी वर्षाचे बर्वे आजोबा. माझ्या आजोबांचे मित्र. राहायचे कुर्ल्याला. घर चाळीतल्या दोन खोल्या. त्यांत त्यांचा मुलगा, सून आणि एक नातू एक-दोन वर्षाचा.त्यांच्या पत्नीला आम्ही कधीही बघितलं नव्हत. मला वाटत फार वर्षापूर्वी तीच निधन झाल होत.

माझे आजोबा गुहागरहून आले की त्यांच्या बरोबर राहायला म्हणून बर्वे आजोबा यायचे पण अधून-मधून आजोबा आले नसतानाही यायचे. आले की चार-पाच दिवस राहायचे. मग आई त्यांच्या आवडीचे, कोकणी, पारंपारिक पदार्थ करायची. तांदुळाची उकड, उकडीचे मोदक, मउसुत तांदळ्याच्या भाकऱ्या, कुळथाच पिठल. नारळाच्या रसातल्या आंबोळ्या असे बरेच पदार्थ. तिची भावना अशी असायची की बर्वे आजोबा स्वतःहून सुनेला काहीही करायला सांगणार नाहीत आणि माझ्या आजोबांनी तिला सांगितलं होत की बर्वे आजोबांना असे पदार्थ खूप आवडतात. माझ्या वडिलांना ते पुरुषा म्हणायचे आणि आईला, सुनबाई. पुरुषा म्हणजे पुरुषोत्तमाच छोट केलेलं नाव.

चार-पाच दिवस घरात आमची चंगळ असायची. त्यांच्यासाठी म्हणून केलेले पदार्थ आम्हाला आवडयाचेच आणि मग मनसोक्त गोष्टीही ते सांगायचे. त्यांच्या कडे गोष्टींचा भरपूर साठा होता.

आम्हाला त्यांनी गीता म्हणायला शिकवली,

कशी?

मला आबांनी मी मोठी झाल्यावर सांगितलं,

‘एक दिवस रात्री बर्वे काका, माझ्या आई-आबांना म्हणाले.

‘पुरुषा, मी दर सहा महिन्यांनी हक्काने तुमच्याकडे येतो. या भेटीची मी आतुरतेने वाट बघत असतो. या चार-पाच दिवसात तुम्ही सर्वजण मला भरभरून देता. पुढच्या सहा महिन्याची बेगमी असतात हे दिवस. सुनबाई माझे लाड करतात, एखाद्या लहान मुलाचे करावेत असे. तुझी मुल मला आजोबा, आजोबा म्हणत माझ्या अवतीभवती नाचतात.तुझ्याकडचे माझे दिवस अगदी आनंदात जातात. पण मला एक खंत वाटते, मीतुमचा पाहुणचार नाही करू शकत,’

“बाबा, अस का मनात आणता, तुमच वास्तव्य आम्हाला समाधान देत आणि मुलाचं म्हणाल तर त्यांना किती छान छान गोष्टी सांगता.”

“मला तुमच्यासाठी अजून काहीतरी कारावास वाटत. पण काय करू ते कळत नाही.”

आई जवळच बसून त्यांचे संवाद ऐकत होती, तिला काहीतरी सुचल,

‘बाबा, मामंजी म्हणत होते तुमची भगवद गीता पाठ आहे म्हणून, तर मग  शिकवता का मुलांना”

आजोबांना आनंद झाला

“अरे वा, हे उत्तम. नातवाला शिकवतो पण ही आपली नात अजून छोटी आहे, तिलाअजून दोन-चार वर्षांनी शिकवूया.”

त्या दिवसा पासून त्यांनी माझ्या भावाला गीता शिकवायला सुरुवात केली, सर्व प्रथम पंधरा अध्याय,

आणि मग पुढच्या प्रत्येक ट्रीपला एक-एक अध्याय.

ते तन्मयतेने त्याला शिकवायचे आणि मी जवळच कुठेतरी काहीतरी करत असायची.

मला आठवतो तो दिवस,

दुपारचे चार वाजलेत,

आईने आजोबांना चहा दिला, आम्हाला दुध आणि मग गीतेच पठण,

भावाने सुरुवात केली,

पंधरावा अध्याय त्याचा तोंडपाठ झाला होता, तो म्हणत असताना, मध्येच त्याला खोकला आला आणि तो थांबला,

आणि,

आणिपुढे मी म्हणायला सुरुवात केली, एकीकडे बाहुलीशी खेळता खेळता माझ पठण सुरु होत.

“अरे वा, ऐकून-ऐकून या पोरीचीही गीता पाठ झाली म्हणायची”

आणि मग त्या दिवसा पासून माझही भावा बरोबर गीता पठण सुरु झाल,

आणि,

आज परत मला त्याचं अस्तित्व जाणवलं.

आता मला गीता पाठ नाही पण ती जगायचा मी मनापासून प्रयत्न करत हे बघून त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता.

आपल्या आयुष्यात कितीतरी जण अशी असतात की काही वर्ष त्याचं आपल्याला विस्मरण होत पण म्हणून ते संपूर्णपणे आपल्या आयुष्यातून पुसले नाही जात, आठवणींच्या पोतडीत कदाचित हरवतात पण शोधले तर नक्की सापडतात.

अश्या आठवणी जगायला बळ देतात हे निश्चित.

Welcome ज़िंदगी – ८

Screen Shot 2018-03-17 at 3.37.30 PM

“AMEN”

There are a few memorable cases that really satisfy a counselor, here is one of those cases.

A smiling face eclipsed by anxiety, she came at the appointed time.

“I don’t understand these people! They are really good and affectionate but…”

“Why don’t you begin from the beginning?”

“I will.”

She described her situation and pictured the whole family with words.

“Aditya, my 11 year old son, told me that there were going to be singing competitions in his school and he was going to participate. I felt quite happy about it. I asked him about the time of those competitions. I was shocked by what he told me and decided to come to you. He said,

‘The competitions are after 20 days. And please, I don’t want any of your advice because everyone except you says that I sing so well that the first place is reserved for me. I don’t need to prepare for that.’”

“Does he sing that well?” I asked her.

“Not at all. He has a good voice but he doesn’t take proper efforts and training. I told him, ‘Don’t say that. There could be other boys singing better than you. We have sufficient time to practice and prepare for the competition.’ Giving me angry looks, he went off. He was mumbling to himself that I just can’t stand anything good happening to him and I will realize his value only when he stands first in the competition.”

She started weeping.

After a while she collected herself. I was still not very clear about what she wanted to say. She wiped the tears and said,

“He looked at me like I was his stark enemy. I am extremely disturbed. I can see that all my in-laws, my husband are good people. But they live in bubbles of dream world and they are quite happy there. One bubble gets dissolved and another takes its place.”

“Will you please elaborate more?”

“I have written a story on this; would you like to read it?”

“No, I would prefer to hear it from you.”

“Ok. I will give you the whole picture. My husband works in a bank. His dream is to become a bank manager but he is not ready to appear for the appropriate exams. Actually he is quite intelligent but he thinks that through my father-in-law’s contacts he will be promoted. My father-in-law is a retired teacher. He thinks that his past students who are now on high posts will help him and promote my husband. Suppose one student doesn’t help he doesn’t feel sad. He enters into another dream of another student helping him. He is always standing on the threshold of bliss. Actually he is not in bliss; he is always in tremendous bliss. He is not just happy, he is overflowing with happiness.”

She paused and then continued,

“My brother-in-law is an engineer. It is now two years that he is waiting for someone to invite him to be a partner in some business because he thinks that accepting a job is not his cup of tea! Hasn’t his father worked all through? Isn’t his brother working? And my parents-in-law, my husband and my sister-in-law help him in waiting for that! They don’t just stop at waiting; they go on building castles in the air about what they would do once the business flourishes. My sister-in-law is a good dress designer but she is not satisfied with small orders. She dreams of having a nice boutique of her own. But she is not ready to accept the fact that she doesn’t have adequate funds for that.”

She went on in desperation and became gloomier after each sentence of hers. These people were quite normal otherwise but why didn’t they understand- this was the question that harassed her no end.

“And now my son is also speaking the same language.”

“…”

I am spending sleepless nights worrying about him. I can clearly see his future. He failed in that singing competition. I was not sad because he lost; his words shattered me.”

“What did he say?” I asked.

“He said, ‘doesn’t matter that I lost! Granny is going to give me a video game. The school would hav egiven me a cup at the most! I am not sorry because he lost, I am soory because he doesnt feel like going into the reason of his failure.”

“Have you talked to all in the family?”

“I tried but they say that being happy in this way is the only way that we middleclass people have in our hands. We have no other go but to live in dreamland.”

“Hmm. What you said just now is the basic cause. but the lable ‘middleclass’ that they have attached to themselves is very dangerous.”

“They dont understand it.”

“But you do, don’t you? So hold on to that principle that you have understood.”

“What do you mean?”

“Try to convinve them…”

“I have tried a number of times.”

“Maybe what you said was in the form of criticism or complaint. It was also a blow to their mental setup/ mentality. You want them to come out of ‘middleclass mentality’ so you will have to make efforts. Perhaps you will have to change yourself a little, be stern at times. Are you ready for that?”

“Yes. I am ready.”

“Please keep in mind that I am not a magician. I am not going to solve your problem, you will have to solve it yourself. I will only prepare you for that. Getting prepared is also in your hands.”

 

“I am ready. I will follow whatever you say/ I will follow your instructions. Once I thought of taking my son with me and leaving the house. But I like them, I love them. They have supported me in difficult times. I want to make our family to be a happy family in the true sense.”

“There is a problem but leaving the house is not the solution. Everyone has some shortcomings. Leaving a person for some shortcoming is like throwing away a book for one bad page.”

“I don’t want to leave them. They are really very good-natured people, they love each other.”

“It is good that you have realized this. We will try to change their attitude.”

“I will go by your word.”

I liked her stand. She is aware of what these people have done for her and she is trying to make them happy.

Thereafter she listened to whatever I told her, understood it and worked on it.

Today her husband is a manager, her brother-in-law has a job.

The family has not given up dreaming; the only difference is that now all of them take efforts to actualize their dreams. And all this became possible only because of her efforts. I liked her very much; she made a deep dent in my heart.

She has taken her family miles away from the ‘middleclass’ tag.

When I pray that every household should have a daughter, daughter-in-law like her I say to myself,

“Amen.”


“तथास्तु ”

समुपदेशकाच्या कामात समाधान देण्याऱ्या, लक्षात राहणाऱ्या काही केसेस असतात.  त्यातली ही एक,

ती आली, फोन करून दिलेल्या वेळेला ती हजर होती,

हसतमुख पण चिंतेने ग्रासलेली,

“काय करू या लोकांच काही कळत नाही, खूप चांगली आहेत, प्रेमळ आहेत पण…”

“मला सुरुवाती पासूनच सांगता का?”

“सांगते.”

तिने सगळी परिस्थिती कथन केली, तिची सांगायची पद्धत फार चांगली होती,माझ्या डोळ्यासमोर तिच्या घरच चित्र उभ राहील.

“माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने, आदित्यने मला जेव्हा सांगितलं की,

“आई, आमच्या शाळेत संगीताच्या स्पर्धा आहेत आणि मी भाग घेतलाय.”

तेव्हा मी आनंदले, मी त्याला म्हटलं,

“अरे वा, छानच की, कधी आहेत स्पर्धा?”

आणि त्याने जे काही म्हटलं ते एकूण मी हादरून गेले आणि तुमच्या कडे यायचं ठरवलं,

तो म्हणाला,

“वीस दिवसांनी, आता कृपा करून तुझा उपदेश नको कारण तू सोडून सगळेजण म्हणाले आहेत की मी इतका चांगला गातो की माझा पहिला नंबर ठरलेला आहे.मला त्यासाठी तयारी करायची गरज नाही.”

“तो गातो का?’ मी विचारलं
“अजिबात नाही. त्याचा आवाज चांगला आहे पण तो गाण शिकत नाही, मग मी त्याला म्हटलं, ‘अस म्हणू नये बाळा, तुझ्यापेक्षा चांगली गाणारी मुलही असतील स्पर्धेत आणि आहे अजून वेळ तर आपण चांगल गाण बसवू तुझ.”

पण माझ्या कडे रागाने बघत बडबडत तो निघून गेला.

“तुला माझ चांगल बघवत नाही. मी पहिला आलो की तुला माझी किंमत कळेल”

तिला रडायला आल,

काहीवेळ गेल्यावर तिने स्वत:ला सावरल, मला अजूनही पूर्ण कल्पना आली नव्हती,

तिला खूप काही सांगायचं होतं. तिने डोळे पुसले आणि म्हणाली,

“त्याने माझ्याकडे अश्या  नजरेने बघितलं जणू काही मी त्याची वैरी आहे. मी खूप अस्वस्थ आहे, मला दिसतंय माझे, सासू सासरे, दीर, नणंद, आणि माझे पती चांगली माणस आहेत पण ती सर्व वलयात राहत्तात, स्वप्नांच्या बुडबुड्यात राहतात आणि आनंदी होतात. एक बुडबुडा विरतो न विरतो तो दुसरा तयार.”

“म्हणजे? जरा सविस्तर सांगता?’
“मी यावर एक गोष्ट लिहिली आहे, तुम्हाला देऊ का वाचायला,”

“नको, मला तुमच्या कडून ऐकायला आवडेल,”

“ओके, मी एकेका बद्दल सांगते,माझे पती, बॅंकेत कामाला आहेत, बॅंकेतमॅनेजर व्हायचं त्याचं स्वप्न आहे पण त्यासाठी परीक्षा देण्याची त्यांची तयारी नाही, खरतर ते हुशार आहेत. पण त्यांना वाटतय, आपल्या वडिलांच्या ओळखीने आपल्याला प्रमोशन मिळेल. माझे सासरे शिक्षक होते आता पेन्शनर आहेत, त्यांना वाटत त्यांचे सगळे विध्यार्थी जे आता मोठ्या पोस्टवर आहेत ते यांना मदत करतील आणि माझ्या पतीला प्रमोशन देतील, एका विद्यार्थ्यांनी मदत नाही केली तरी यांना त्याचं वाईट नाही वाटत, एक स्वप्न विरून गेल की हे लगेच दुसऱ्या स्वप्नात रमतात आणि त्यांना वाटत, दुसरा विध्यार्थी नक्की मदत करेल. कायम हे खोट्या आनंदाच्या वरच्या पायरीवर उभे असतात. यांना नेहमी आनंद नाही होत, यांना प्रचंड आनंद होतो, यांच्याकडे नुसत सुख नसत ते भरभरून वाहत असत. माझा दीर इंजिनिअर होऊन दोन वर्ष झाली पण कोणीतरी ओळखीने आपल्याला पार्टनर करून बिझिनेस मध्ये बोलावेल याची हा वाट बघतोय नोकरी करण याच्या रक्तात नाही अस याला वाटत. याच्या वडिलांनी नोकरीच केली ना? याचा भाऊ पण नोकरीच करतोय, आणि माझे सासू-सासरे, माझा नवरा, नणंद  त्याच्या वाट बघण्यात त्याला मदत करतात. बर, नुसत वाट बघणही यांना पुरत नाही, अजून सुरूही न झालेला बिझिनेस भरभराटीला आल्यावर काय करायचं, याचे इमले बांधत हे प्रचंड खुश होतात. माझी नणंद उत्तम ड्रेस डिझाईन करते पण छोट्या-छोट्या ऑर्डर हिला नको असतात, एखाद सुंदरस बुटिक उघडायच हे हीच स्वप्न आहे. त्यासाठी लागणारा पैसा आपल्याकडे नाही, ही साधी गोष्ट हिला मान्य नाही,”

ती उद्ग्वेगाने बोलत होती, प्रत्येक वाक्यानंतर हताश होत होती, बाकी सगळ्या बाबतीत नॉर्मल असलेल्या या माणसांना हे का कळत नाही. हा प्रश्न हिला सतावतोय,

“आणि आता माझा मुलगाही हीच भाषा बोलायला लागला आहे,”

“…” मी ऐकत होते

“रात्र-रात्र चिंता मला ग्रासते, मला स्पष्ट दिसतंय माझ्या मुलाच भवितव्य, गाण्याची स्पर्धा तो हरला. मला तो हरल्याच वाईट नाही वाटलं पण त्याच उत्तर एकूण मी हादरले.”

“काय म्हणाला तो?” मी विचारलं.

“तो म्हणाला, ह्या, नाही तर नाही. आजी मला व्हिडीओ गेम घेऊन देणार आहे. शाळेने फार तर एक कप दिला असता.तो हरला याच मला वाईट नाही वाटत्येय,मला वाईट हे वाटतय की आपणका हरलोय याच कारण त्याला शोधावस वाटत नाही”

‘तू सगळ्यांशी बोललीस का?”

“प्रयत्न केला पण त्याचं म्हणण अस आहे की आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या हातात असच आनंदात राहाण असत. स्वप्नात राहण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.”

“हं, हे जे काही तू आत्ता म्हणालीस तेच मूळ कारण आहे. ‘पण’ हा फार घातक असतो. आपल्याला मध्यमवर्गीय हे जे त्यांनी लेबल लावलंय ते घातक आहे.”

“त्यांना ते कळत नाहीये,”

“तुला कळलय न, तेच सूत्र धरून ठेवायचं.”

“म्हणजे?”

“त्यांना पटवून द्यायचं…”

“खुपदा प्रयत्न केला”

“तुझा प्रयत्न टीका, तक्रार या स्वरूपात होता, त्यांच्या वृत्तीला धक्का देणारा होता, आपल्याला ‘मध्यमवर्गीय’ या शब्दाला छेद द्यायचाय, यासाठी, तुला प्रयत्न करावे लागतील, कदाचित तुला थोड बदलाव लागेल, काही प्रसंगात कठोर व्हाव लागेल, आहे तयारी?”

“आहे”

“मी जादुगार नाही, मी तुझा प्रश्न सोडवणार नाही, तूलाच तुझा प्रश्न सोडवायचा आहे. मी तुला त्यासाठी फक्त तयार करीन अर्थात तू तयार होशील की नाही हेही तुझ्या हातात आहे.”

“मी तयार आहे. तुम्ही म्हणाल ते मी आत्मसात करीन, मी मुलाला घेऊन घर सोडायचा विचार केला होता, पण मला माझी माणस आवडतात, त्यांच्यावर माझ प्रेम आहे. माझ्या अडचणीच्या कळत त्यांनीच मला सावरल, मला आमच घर खऱ्याअर्थाने सुखी करायचय.”

“प्रश्न निर्माण झालाय तर घर सोडण हा उपाय असू शकत नाही. दोष सगळ्यांच्यात असतात. दोषासाठी कोणाला सोडणं म्हणजे पुस्तकाचं एक पान खराब झाल म्हणून पुस्तक टाकून देण्यासारख आहे.”

“मला त्यांना सोडायचं नाहीये. माझ्या सासरची माणसं अतिशय सज्जन आहेत. एकमेकांवर प्रेम करणारी आहेत.”

“हे तुला जाणवलय ही चांगली गोष्ट आहे. आपल्या प्रयत्नांनी त्यांचा attitude बदलायचा प्रयत्न करायचा.”

“तुम्ही सांगाल ते करीन मी.”

मला तिची भूमिका आवडली, मनाला भावली, आपल्यासाठीया लोकांनी काय केलंय याची तिला जाणीव आहे, आपल्यासासरच्या लोकांना सुखी करायला ही धडपडत आहे.

त्यानंतर मी जे सांगेल ते शिकत होती, पटवून घेत होती आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक झटतही होती,

आज तिचा नवरा मॅनेजर आहे, दिराला नोकरी आहे,

त्याघराने स्वप्न बघण सोडलेलं नाही फरक इतकाच आहे की स्वप्न पूर्ण होतील यासाठी प्रत्येकजण झटत  असतो आणि हे सर्व शक्य झाल तिच्या प्रयत्नाने

ती मला फार आवडली, माझ्या मनात खोलवर रुतून बसली,

माझ्याकडे ती वारंवार पेढे घेऊन येते,

आपल्या घराला तिने ‘मध्यमवर्गीय’ या लेबल पासून फार दूर नेलंय,

अशीमुलगी,सून, अशी स्त्री प्रत्येक घराला मिळो,

अस माझ्या जेव्हा मनात येत तेव्हा मीच मला म्हणते.

‘तथास्तु’

Welcome ज़िंदगी – 7

slide7.3

A FACELESS MOTHER

When does an author feel properly appreciated?

When readers meet or call him and tell that they liked his/ her book. As an author, I feel happier when I have conveyed to the reader whatever I mean to say.

Once a 70 year old man read my “मी NRI” (‘I, an NRI’) and called me.

“I read your ‘मी NRI’ and liked it tremendously. I also tried to behave on the lines given in the book. I am very happy to tell you that now when my daughter-in-law comes home from work, I make coffee and we drink it together and chat. Since I started this a father and daughter relation has develop between us. Now, our relationship is on the path of happiness. I have also learnt how to make snacks like pohe, upama etc. and prepare those as well. ‘Not the ingredients but how much of your love and care goes into it makes a dish tasty.’ This sentence of yours from the book is engraved on my mind.”

“Who all are there in your family?”

“My wife passed away four years ago. My son, daughter-in-law, grandson and I live together. Your book gave me a new vision. Had someone asked me a few days back about my daughter-in-law, I would have said that she is 20% good. But now I will certainly say that she is 99% good. This magical change is brought about by your book, it changed my perspective. Thank you very much. Please go on guiding us through your writings.”

What I meant is exactly this! And I was very happy that it reached my readers well.  His call was a kind of reward given to my book.

Somebody read my other book ‘Ryan’ and called me,

“I was extremely scared of dogs before reading your ‘Ryan’; I treated them inhumanly. Upon reading your book I realized that dogs are even more sensitive than us humans. That realization changed my attitude towards them. I want to visit you and see the place where Ryan is buried.”

He came over with his grandchildren and moved his hands over the place tenderly and affectionately.

I get many experiences like these. More than the profit made by a book or the awards received by it, this kind of response touches my heart.

Here is an experience that touched my mind and disturbed me; it was definitely not a happy experience. Though apparently very harsh and cruel words were uttered by faceless mother I found the thinking of as a mother instinct.

The phone rang at ten in the morning,

“Hello, am I speaking with Pratibha Deshpande?”

“Yes.”

“I am a mother and I read your book ‘आई’ (‘Aai’) recently. It is a very good book.”

“Thank you very much. May I know who is calling?”

“Would it be ok if I don’t disclose my name?”

“Sure. No problem.”

“I want to share something with you and want your opinion on that. Is it ok with you? Can you spare some time now or should I call you some other time?”

“Now is fine. Please go ahead.”

“You can call me ‘Aai’. I am 72 years old and I have two sons. The elder one is 40 and the younger one is 32 years old. My husband expired 8 years back. My younger son and I stay together. He is CP.”

“I am sorry to hear that.” CP means cerebral palsy

“Don’t you work for an institution for such people?”

“Yes, I do.”

“I am suffering from cancer and the doctors have given me at the most one year of life.”

“Please dont say that. Now science is at a very advanced stage and more cures, treatments are available.”

“The treatment is going on but there is not much hope for me. But I want to tell you something different.”

“Tell me, I am listening.”

“I am troubled by the anxiety of what will happen to my son after I die.”

“His elder brother…”

“No. that door is closed! The elder one has made it amply clear that I should admit this one in some institution and then I can go and stay with him. He promised that he will take very good care of me and look after me.”

“Our institution has only Day Care facility.”

“I know that. But I am trying to tell you something else. I have seen some other institutions also and I don’t think my son will be properly looked after in any of them.”

“There is truth in what you say.” I admitted.

“Therefore for the last few days I am praying to god that my son should pass away before I die.”

“…”

“The whole day I am counting my beads on this. I have read about the technique of auto suggestion in your book ‘चला आयुष्य घडवूया’ (Let us shape our life); I am practicing that right now.”

“Aai, I have written about this technique for making life and you want to end a life.”

“Try to place yourself in my shoes. But, no… for god’s sake do not do this! Even the worst of my enemies should not go through that ordeal. The whole day I keep praying for his death in the belief that I will happily breathe my last after him. And I spend the nights crying to myself thinking ‘I am a horrible mother’. A mother worships the god so that her child lives a long life and here I am hoping for my son’s death…”

“Please calm down, don’t cry. I can understand what you are going through and what you want to tell me.”

“I knew you would understand me. Tell me; is it wrong to pray like this?”

“I really don’t know how to console you. I have no words for you.”

“…”

“Please don’t cry. Should I come and see you? Then we can talk peacefully at length.”

“Thanks but that is not necessary. I only want an assurance from you that I am not a bad mother; I am thinking only of the good of my son.”

“…” I said nothing

“Really, I am worried about what will happen to my son after me…”

Her plight touched me. Since I run a NGO of adult Cerebral palsy, I can understand what she wants to say. I have come across mothers going through mental hell with the anxiety of the child. And the same worry agitates me.

“Aai, I won’t say that you are doing the right thing but certainly you have only the good of the child at heart when you think about his death. Don’t blame yourself. Keep looking for some other way out. Because, many times we go on thinking in one direction and close doors on other ways. I don’t know even your name. If you tell me a few things about yourself maybe I can help you. I can talk to you elder son. Perhaps we will find a solution with his help…”

“Thank you very much. I will give it a thought and call you again if required. Does the technique of Auto Suggestion work definitely?”

“Yes, but…” she did not allow me to complete the sentence.

“Please pray for me that this technique works for me at the soonest. I don’t trust anyone after me.”

I did not reply to her.

Should I say ‘Amen’?

Can’t really decide.

But this kind of a reader stays in the mind; that is certain.


‘बिनचेहेऱ्याची आई’

लेखकाला आपल्या लेखाची पावती कधी मिळते?

जेव्हा वाचक त्याला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून पुस्तक आवडल्याच सांगतात तेव्हा. ‘मला काय म्हणायचय?’ हे जेव्हा वाचकां पर्यंत पोहोचत’ तेव्हा मला जास्त आनंद होतो.

एकदा एका सांगलीच्या एका सत्तर वर्षांच्या गृहस्थांनी ‘मी NRI” हे पुस्तक वाचून मला फोन केला आणि सांगितलं,

“तुमच ‘मी NRI’ हे पुस्तक वाचल. फार आवडलं आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे वागलो. आता मला सांगायला आनंद होतो आहे की, माझी सून ऑफिस मधून घरी आल्यावर मी जेव्हा तिला कॉफी करून देतो आणि आम्ही दोघ गप्पा मारत कॉफी पितो त्यामुळे मला ती मुली सारखी वाटते आणि तिला मी तिच्या बापा प्रमाणे वाटतो. आमच्यातल नात आनंदाच्या दिशेने चालल आहे. आता मी पोहो, उपमा कसा करायचा हेही शिकलो आहे आणि आलटून पालटून हेही पदार्थ करत असतो.

‘पदार्थ चविष्ट होण्यासाठी साधनांची गरज नसते तर आपण तो पदार्थ करताना किती जीव ओतून करतोय आणि खाणारा हा आपला आहे ही भावना ठेवण यावर त्याची चव अवलंबून असते’ हे तुमच वाक्य मी मनात कोरून ठेवलय, ”

“आपल्या घरी कोण-कोण असत?”

“माझी पत्नी चार वर्षापूर्वी वारली, मी, मुलगा, सून आणि दोन नातवंड राहतो. आणि तुमच पुस्तक वाचून मला एक नवीन दृष्टी मिळाली. काही दिवसापूर्वी मला कोणी विचारलं असत की माझी सून कशी आहे तर मी उत्तर दिल असत, २०% बरी आहे पण आता मात्र म्हणीन की ९९% उत्तम आहे आणि ही किमया कशी  झाली? तर माझा दृष्टीकोन मी बदलला आणि तुमच पुस्तक याला कारणीभूत ठरलं. thank you very much. असच तुमच्या लिखाणातून आम्हाला मार्गदर्शन करत रहा”

मला जे म्हणायचं होत ते नेमक हेच आणि ते वाचका पर्यंत पोहोचल याची पावती मला मिळाली आणि मला फार आनंद झाला.

दुसऱ्या वाचकाने “रायन’ हे पुस्तक वाचून फोन केला,

“मी कुत्रांना अतिशय घाबरत होतो आणि म्हणून त्यांच्याशी वागताना inhuman treatment’ त्यांना देत होतो पण तुमच ‘रायन’ हे पुस्तक वाचून मला समजल की आपल्यापेक्षाही प्राणी जास्त भावनिक असतात. आता त्यांच्या कडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे, त्याला जिथे तुम्ही तो गेल्यावर पुरल आहे ती जागा मला बघायाची आहे.”

ते गृहस्थ त्यांच्या दोन नातवंडाना घेऊन आले, आणि त्यांनी त्या जागेवरून मायेने हात फिरवला.

असे बरेच अनुभव येतात. पुस्तक किती खपल? पुस्तकाला किती पुरस्कार मिळाले यावरून पुस्तक कस झालय यापेक्षा अशी पोचपावती मनाला जास्त भिडते.

असाच एक फोन,

मनाला भिडणारा, अस्वस्थ करणारा, आनंद देणारा निश्चितच नाही पण दु:खही देणारा नव्हता.

सकाळी दहाला फोन वाजला,

“हॅलो, आपण प्रतिभा देशपांडे बोलताय का?”

“हो”

“मी एक आई बोलतेय. मी तुमच ‘आई’ पुस्तक वाचल. फारच छान आहे”

“thank you very much, आपल नाव?”
“नाव नाही सांगितलं तर चालेल का?”

“चालेल की”

“मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. आणि त्यावर तुमच मत घ्यायचं आहे. चालेल का? तुम्हाला वेळ आहे न आत्ता, की नंतर फोन करू?”
“आहे वेळ, आता बोलू शकतो.”

“माझ नाव आई, आणि वय बहात्तर, मला दोन मुल, मोठा चाळीस वर्षांचा, त्याच लग्न झालय त्याला दोन मुल आहेत, आणि धाकटा बत्तीस वर्षाचा, माझे पती जाऊन आठ वर्ष झालीयेत, मी आणि माझा धाकटा मुलगा एकत्र राहतो, आणि तो बहुविकलांग आहे”

“I am sorry to hear this”

“तुम्ही अश्या संस्थेचे काम बघताना?”

“हो”

“मला कॅन्सर झालाय. फार-फार तर माझ आयुष्य एक वर्षाचं आहे.”

“अस का म्हणता, आता सायन्स पुढे गेलय, सगळ्यावर इलाज होऊ शकतात.”

“ते तर चालेलच आहेत, पण फारशी आशा नाहीये, आणि मला तुम्हाला वेगळ सांगायचय,”

“सांगा मी एकते आहे.”

“माझ्या नंतर या मुलाच काय होईल ही चिंता मला सतावात्येय,”

“त्याचा मोठा भाऊ…”

“नाही हो, तो मार्ग माझ्याकडे नाही, त्याने स्पष्ट सांगितलंय की या मुलाला एखाद्या संस्थेत भरती कर आणि माझ्याकडे राहायला ये. तो माझ सगळ व्यवस्थित करेल.”

“आमच डे केअर आहे”

“मला माहित आहे. मला दुसरच म्हणायचय, मी काही संस्था बघितल्या, पण मला वाटत नाही की अश्या संस्था माझ्या मुलाची चागली काळजी घेतील,”

“आहे खरी तशी परिस्थिती”

“म्हणून गेले काही दिवस देवाला प्रार्थना करत्येय, ‘माझ्या आधी माझ्या मुलाला मरण येउ दे.”

“…” मला काय बोलाव कळेना.

“दिवसभर माझा हाच जप असतो, तुमच दुसर पुस्तक मी वाचायल, ‘चला आयुष्य घडवूया’ त्यांत तुम्ही ‘auto suggestion’ या तंत्रा बदल लिहिलंय, तेच तंत्र मी सुरु केलंय”

“आई, हे तंत्र मी ‘आयुष्य घडवायचं कस?’ यासाठी लिहिलंय, तुम्ही तर एक आयुष्य संपवायला निघाला आहात.”

“माझ्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवून बघ, नको-नको, अजिबात अस करू नका, शत्रूवरही माझ्या सारखी वेळ यायला नको. दिवसभर मी या विश्वासावर हा जप करते की अस झाल तर मी सुखाने मरायला मोकळी होईन, पण रात्र मात्र रडून काढते की, ‘किती वाईट आई आहे मी, माझ्या मुलाच्या मरणाची मी आशा करत्येय. आईतर मुलाच्या दीर्घायुष्यासाठी जिवतीची पूजा करते, आणि मी,…”

“शांत व्हा तुम्ही… रडू नका, मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचय ते”

“मला वाटलच तुम्ही समजू शकाल ते. मला सांगा, मी हा जप करतेय तर अस करण चूक आहे का?”

“मला खरच कळत नाहीये की तुमच सांत्वन मी कस करू? मला खरच कळत नाहीये”

“…” ती फक्त रडत होती.

“प्लीज रडू नका, मी तुम्हाला येऊन भेटू का? मग आपल्याला शांतपणे बोलता येईल”

“नको-नको, मला फक्त तुमच्या कडून हा दिलासा हवा आहे की मी वाईट आई नाहीये, मी माझ्या मुलाच हितच चिंतत आहे”
“…” काय बोलू हे कळेना. ज्या तत्वाचा उपयोग मी लोकांना त्याचं आयुष्य चांगल व्हाव म्हणून करायला सांगते त्या तत्वाचा उपयोग यासाठी करावा लागण हे दुर्दैव.

“खरच सांगते, माझ्या नंतर माझ्या मुलाच काय होईल…”

मला तिची व्यथा जाणवली, गेले कित्येक वर्ष मी या संस्थेच काम बघते, ही आई, आत्ता कुठल्या मन:स्थितीतून जाते आहे हे मी काही मुलांच्या बाबतीत अनुभवत्येय, आई-वडिलांच्या माघारी अश्या मुलांची स्थिती मनाला व्याकूळ करते.

“आई, तुम्ही योग्य करताय अस मी म्हणणार नाही पण हे नक्की की, तुम्ही मुलाच्या मरणाची इच्छा त्याच्या चांगल्यासाठी करताय, स्व:तला दोष देऊ नका, त्यापेक्षा अजून काही मार्ग निघतो का याकडे बघा, कित्तीवेळा, आपण फक्त एका दिशेने विचार करतो आणि मग दुसरा मार्ग आपणआपल्याच हाताने बंद करतो, मला तुमच नाव-गाव  नाही माहिती, सांगितलत तर मला काही प्रयन्त करता येतील, तुमच्या मोठ्या मुलाशी मी बोलू शकते, त्याच्या मदतीने आपण दुसरा काही मार्ग काढू शकतो,…”

“thank you very much, मी विचार करीन आणि वाटल तर परत फोन करीन, तुमच तंत्र नक्की उपयोगी ठरत न? माझ्यासाठी प्रार्थना करा की या तंत्राचा  मला लौकरात लौकर उपयोग होऊ दे. माझ्यानंतर माझा कोणावरही विश्वास नाही,”

मी उत्तर दिल नाही,

मी काही बोलत नाही हे बघून  तिने फोन ठेऊन दिला.

काय करू,

तथास्तु म्हणू का?

हेही माझ अजून ठरत नाहीये,

असा वाचक मन सुन्न करतो हे नक्की

Welcome ज़िंदगी – ६

slide7

Psychological preventive measures’

While in school, every year a doctor visited the school and injected the students with smallpox, typhoid and cholera vaccinations. The next two days, with a swollen and paining hand, we used to groan and snarl at the school and Aai, our mother. Aai tried to convince us that the injection was essential to avoid these diseases in the future. Besides this we were made to gulp down unpleasant vegetables like spinach, bitter gourd, ribbed gourd and the likes with water; the basic rule and principle being ‘eating the first serving in the plate without complaints’! (I never ever believed that there could be a better vegetable than potato in the world.) In the evening it was mandatory to bow down to god and then recite tables and shloka (श्लोक). I recited them in such a manner that my father use to say,

“Even if the father of the God Brahma listens to it, he will not understand a word of what Pratibha is reciting!”

The recitation should have taken at least 20 minutes but I managed to complete it in 5 to 7 minutes!

As I grew up I started realizing the true import of the exercise. For physical immunity we have good food, exercise, washing hands and feet after entering the house etc. was practiced. This was for

‘Prevention better than cure’
‘An ounce of Prevention is worth a pound of cure’

Similarly, recitation, worship of god, meditation, counting beads (जप) was practiced for improving concentration of mind.

‘Psychological preventive measures’

What can be done to develop mental strength? Some are strong or tolerance by nature. But can we call it as ‘emotional balancing’ rather than strong or tolerance?

Life is not something well-chalked out or preplanned or pre-designed or predetermined. We have to go through unexpected situations. Life that is so beautiful at some moment may turn out to be shocking the next moment.

  • The going is good and one morning you realize that your dear one sleeping next to you is not waking up; then you lose trust in life. Can such a life be called as beautiful?
  • When the dream of a new house is about to be fulfilled,  suddenly you lose your job.
  • You are living happily with your partner and out of the blue the partner declares that he wants to divorce you?
  • In spite of well qualified and trying your best you can’t find a job.
  • Many such incidents are taking place in life.

These are some of the examples of  my clients who approach me for counselling. They do not know how to come out of a difficult situation. Rather, they don’t believe that they can come out of it and then they suffer through ‘psychological/ mental illnesses’. Some of these illnesses are-

  • Depression
  • Thoughts of suicide
  • Tensions and stress
  • Fear
  • Anxiety
  • The list can go on and on!

They are not even aware that they have the ability to face any situation; though it is latent. (hard wire)

If I tell my client or patient

  • That the way you think is wrong and you will have to change it,
  • You will have to learn REBT technique, creative visualization, auto suggestion, mindfulness, yoga,
  • You have to observe your shortcomings?
  • Also that to maintain a relationship you will have to think about why to accept the other person as he/ she is?

No-no!

That is absolutely impossible. A person going through difficult times is not in that mental frame at all. Then he blames his fate and feels dejected. He accepts a situation dejectedly and is engulfed by depression.

So the question

  • How to accept a situation?
  • How to throw out or get rid of drawbacks (anger, stress, jealousey, lust, greed, excessive compassion etc.) within us or at least reduce their intensity?
  • How to adjust with another person?
  • How to handle and accept failure?
  • How to handle success?
  • The list is unending!

To put it in one sentense-

All this is easily possible and to make that happen is in our hands.

Psychological preventive measures are required for that. And we have to practice them while we are happy. But it so happens that when things are going smoothly and we are happy we think that all those efforts are not really needed. And then we remain inattentive or negligent.

Earlier it was thought that intellectual skills are required in order to be successful; recent research has proved that for success and happiness 70% of emotional and spiritual skills and only 30% of intellectual skills are required.

Actually we Indians are quite fortunate. We can certainly say that spirituality runs through our blood.  A lot of people are in awe of the very word ‘spirituality’. They think that it is not their cup of tea. That should not be the case because ‘spirituality is the relationship of our inner self/ mind with the external world’.

We can learn these to keep this relationship at its best by Psychological preventive measures like,

  • Spiritual skills
  • Emotional skills
  • Introduction to psychology
  • meaning of Positivity
  • Thinking skills
  • REBT technique,
  • creative visualization,
  • auto suggestion,
  • mindfulness,
  • yoga,
  • Many other things!

If we internalise these easily we can be always ready to accept any situaton or to fight with it at times.

There are six major constituents of psychological/ mental health:

Let us start taking care of our mental health with the help of Psychological preventive measures.

Because we should not start digging a well when you are thirsty!

Pratibha.


 

मला आठवतंय शाळेत असताना दरवर्षी आम्हाला डॉक्टर येऊन देवीची लस, टायफायड, कॉलरा याच इंजक्शन द्यायचे आणि मग पुढचे दोन दिवस आम्ही दुखरा आणि सुजरा हात घेऊन शाळेवर आणि आईवर विव्हळत गुरगुरायचो. त्यावेळी आई सांगायची, पुढचे आजार नको असतील तर हे इंजक्शन घेण गरजेच आहे. शिवाय आम्हाला न आवडणाऱ्या पालेभाज्या, कारलं, दोडका आणि इतर बऱ्याच भाज्या पानात वाढलेलं खायलाच पाहिजे या तत्वावर एका पाण्याच्या घोटा बरोबर गिळायला लागायच्या. बटाट्याशिवाय जगात उत्तम भाजी असेल यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. संध्याकाळी देवाला नमस्कार आणि त्यावेळी परवाचा आणि श्लोक कंपल्सरी होते. अर्थात मी ते अस म्हणायचे की बाबा म्हणायचे,

‘ब्रह्मदेवाचा बाप आला तरी प्रतिभा काय म्हणत्येय हे त्याला कळणार नाही.’

पाढे आणि श्लोक म्हणायला साधारणपणे सुमारे वीस मिनिट तरी लागावीत ती मी पाच ते सात मिनिटात उरकायची.

जस जशी मोठी होत गेले त्यामागचा अर्थ लक्षात यायला लागला. जस शारीरिक रोग न होण्यासाठी उत्तम खाण, व्यायाम, बाहेरून आल्यावर हात पाय धुणं, खाताना हात धुणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवण हे उपाय केले जायचे तसेच श्लोक, देवाची पूजा, ध्यान, जप हे उपाय मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी केले जायचे.

मनबळ वाढवण्यासाठी काय करता येईल?

काहीजण जात्याच सोशिक असतात. पण सोशिक म्हणण्यापेक्षा सोशिकतेला भावनिक तौलीकता अस म्हणता येईल का?

आयुष्य हे आखीव रेखीव नसतं. प्रसंग सांगून येत नाहीत. आता या क्षणाला सुंदर वाटणार आयुष्य दुसऱ्या क्षणाला मोठा धक्का देऊन जात.

  • ‘आयुष्य मस्त चालू असताना सकाळी जाग आल्यावर जेव्हा लक्षात येत की शेजारी गाढ झोपलेला जिवलग जागाच होत नाही, तेव्हा जीवनावरचा विश्वास उडतो. अश्या आयुष्याला सुंदर म्हणायचं?’
  • नवीन घराच स्वप्न आता साकार होणार अस वाटत असतानाच अचानक नोकरी जाते.
  • आपला संसार मस्त, उत्तम चालू आहे अस वाटत असताना आपल्या जोडीदाराने मला विभक्त व्हायचंय अस म्हटलं तर?
  • खूप प्रयत्न करूनही नोकरी नाही मिळत
  • असे अनेक छोटे मोठे प्रसंग

ही उदाहरण आहेत माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या लोकांची, ज्यांना कठीण वाटणाऱ्या प्रसंगातून बाहेर कस यायचं? हे माहित नसतं. किंबहुना बाहेर येता येत यावर विश्वास नसतो आणि मग माणसांना होतात मनाचे विकार

  • नैराश्य
  • आत्महत्येचे विचार
  • ताण-तणाव
  • भीती
  • Anxiety
  • यादी कितीही मोठी होऊ शकेल.

यांना हेही माहित नसतं की या कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती आपल्या मध्ये hard wire आहे. फक्त ती सुप्तावस्थेत आहे जी जागृत करण्याची गरज आहे. याला आपण Psychological preventive measures अस म्हणू शकतो.

अडचणीत असताना येणाऱ्या पेशंटला जर सांगितलं की

  • वाईट विचार करू नकोस,
  • तुझी विचार करण्याची पद्धत चुकीची आहे ती बदलायला लागेल,
  • REBT technique, creative visualization, auto suggestion, mindfulness, yoga, या गोष्टी तुला शिकायला लागतील,
  • तुझ्यातले जे दोष आहेत त्यांचा विचार व्हायला हवा.
  • नातेसंबंध कसे टिकवायचे त्यासाठी दुसऱ्या माणसाचा तो आहे तसा स्वीकार का करायचा? हे सर्व तू शिकायला हवस तर…?

छे: छे: हे अजिबात शक्य होणार नाही, पिडीत माणूस त्या मन:स्थितीतच नसतो. त्याचा मेंदू हे काहीही स्वीकारण्याच्या स्थितीत नसतो. आणि मग आपल दैव दुसर काय अस म्हणून तो हताश होतो. आणि जशी मन:स्थिती तशी परिस्थिती स्वीकारून हताश होतो किंवा त्याला नैराश्याने गेरल जात.

  • परिस्थिती कशी स्वीकारायची?
  • आपल्यातले दोष (क्रोध, ताण-तणाव मत्सर, लोभ, लालसा, (lust), मोह अति माया) कसे काढायचे किंवा त्यांची पातळी कशी कमी करायची?
  • दुसऱ्या माणसाशी कस जुळवून घ्यायचं?
  • अपयश कसं स्वीकारायचं
  • यश कसं हाताळायाचं
  • खरतर यादी खूप मोठी होईल.

यासाठी एका वाक्यात सांगायचं तर

‘Psychological preventive measures’

हे सर्व सहजशक्य होईल आणि ते शक्य करण स्वत:च्या हातात आहे.

यासाठी हवी Psychological preventive measures. आणि त्याची सवय करायला हवी जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा. पण होत अस की आपण जेव्हा आनंदी किंवा आपल सर्व छान चाललय अस वाटतं तेव्हा या सर्व खटाटोपाची गरज नाही अस वाटत आणि आपण गाफील राहतो. पूर्वी यशस्वी व्हायला बौद्धिक कौशल्याची गरज आहे अस वाटायचं पण आता संशोधनाने सिद्ध झालय की यशस्वी, आनंदी राहायला भावनिक आणि अध्यात्मिक कौशल्याची गरज ७० टक्के आहे आणि बौद्धिक कौशल्याची गरज फक्त ३० टक्के आहे.

खरतर आपण भारतीय खूप नशीबवान आहेत. आपण अस निश्चित म्हणू शकतो की आपल्या नसानसात अध्यात्म आहे. अध्यात्म या शब्दानी बरेच जण घाबरून जातात. हे आमचे काम नव्हे. अस बऱ्याच जणांना वाटत. ‘अध्यात्म म्हणजे माझं माझ्या आतल्या जगाच (मनाचं) बाहेरच्या जगाशी असलेलं नातं म्हणजे माझं अध्यात्म.’

हे नात उत्तम ठेवण्यासाठी काय करायचं तर…

Psychological preventive measures

  • अध्यात्मिक कौशल्य
  • भावनिक कौशल्य
  • मानसशास्त्राची तोंड ओळख
  • सकारात्कता म्हणजे काय?
  • विचार करण्याची पद्धत
  • REBT technique,
  • creative visualization,
  • auto suggestion,
  • mindfulness,
  • yoga,
  • अजून बरचं काही

हे सर्व सहज सवयीनं अगीकारली तर?

तर मग येणाऱ्या परिस्थितीला आपण स्वीकारायला, वेळप्रसंगी लढायला आपणसतत तयार असणार आहोत. वेळ आल्यावर बघू, अशी जी माणस म्हणतात त्यांना वेळ आल्यावर काय करायचं हे सुचत नाही.

मानसिक आरोग्याचे मुख्य सहा घटक मानले जातात:

  • स्व:स्वीकार Self-acceptance
  • वैयक्तिक विकास Personal growth
  • जगण्यातला हेतू Purpose in life
  • परिस्थितीवर मात Environmental mastery
  • स्वायत्तताAutonomy
  • इतरांबरोबर सकारात्मक संबंध Positive relations with others

चला तर मग

आपलं मानसिक स्वास्थ उत्तम करूया

कारण

वेळ आल्यावर विहीर खणायला सुरुवात करायची नाही आपल्याला…

प्रतिभा

Welcome ज़िंदगी – 5

slide6

I wanted to do something for quite some time but it was not really happening. I had written “Eka Gharachi Goshta” “एका घराची गोष्ट”  “Story of home” about seven years back. I wished that the old age home described in that book should exist in reality.  But there were no efforts from my side in that direction; I had just penned it down on paper and left it at that. I also enjoyed the respect that was given to me by the society for writing a beautiful book. I kept thinking about ‘what to do?’ but could not find a way. May be, I didn’t want to find a way! I just kept saying ‘right now I am very busy, I don’t have time’. But I came to my senses when a friend of mine asked me,

“How do you find time to do so many things?”

And my answer was

“If you have the will you find time to do things you really like. Not having time is only an excuse.”

Am I really behaving like this and if the answer is yes, then what about my idea of old age home the way I wanted it?

And I literally woke up with a start!

I decided to start working on it right away. To begin with, I had to have a different name for ‘old-age ashram’. The place had to be like a home where seniors will live a happy and respectful life. They should be treated in such a way that their personality should be respectfully looked after. They can live with their chins up. The word ashram conveys a sense of surrender. Though these are old people why should there be this sense of surrender or giving up and depending on someone? It has to be a place where they can rightfully have a happy life. ‘Senior Citizens’ Home’ seemed to be a perfect name.

Great! It will be a ‘Senior Citizens’ Home.

It was 14th of November 2017,

Time- 11 am,

place- Madhur Bhav. (A place where senior citizen resides)

I arrived there.

My friend Dr. Sanjivani Rahane also joined me in this project.

“Good morning”, gathering all my energy I greeted them.

In reply I got an insipid

“Good morning” from them.

There was a shade of doubt in the voices as well.

I could almost hear the question ‘Who is this lady?’

One grandmother asked,

“Who has sent you here?”

“Nobody has sent me; I have come here on my own.” I answered.

“No one visits us like this; perhaps some institution has sent you?”

“No Auntie, I am here because I wanted to come here.”

“Why?”

How to answer that ‘Why?’

“Auntie, I am pratibha. I want to chat with you so I will be coming here on every Tueaday. Would you like that? We will talk; we can also sing.”

“Let’s see.”

This answer reminded me of a small child. Old age is said to be the second childhood and I wanted to find out why they say so.

We all sat forming a circle. 16- 17 grandmas and grandpas.

Some didn’t step out of their rooms.

I went to one granny and said, “Auntie, why don’t you come out and join us? Let us all sing songs.”

She did not utter a single word; like I didnt exist there.

I put my hand on hers and said,

“Dont you feel like joining us today? It’s alright. Do join us the next time.”

All those who gathered were quite enthusiastic. They had read ‘Eka Gharachi Goshta’ and they had accepted that Madhur Bhav was their home now.

“Madam…”

“My name is not ‘Madam’. My parents fondly named me ‘Pratibha’. Would you all like to address me by that name?

“But…

“I would appreciate it very much if you do that.”

“In that case we will call you Pratibha.”

“You are much younger to us.” Someone said.

“No, I am a senior citizen too. And I am quite proud of it. Do you know my definition of old age?”

“What is it?”

“Wisdom that is accumulated through experiences is old age.”

“But our children don’t accept that. They always say, ‘you don’t understand anything. Now you have grown old.’ And they dump us here.” One grandpa said.

“If the children don’t agree with that, it is their problem;. We should go by what we feel.” I told them.

“Yes. This is correct, I agree with it.” A grandma said.

“Grandma, tell me how much time do you have now to spend on what others think? Siging, dancing- a lot remains to be done. Hereafter we want only joy. Right?” I was observing them.

“Correct, you said it!” All of them declared in chorus.

“Let us give a big hand on that.” I started clapping.

All of them happily clapped and clapped.

“So folks, now it is decided that let others say whatever they want to say, let them behave the way they want to behave; it will not make any difference to us. We will live happily. Deal? Agreed?”

“Yes.” Again a chorus.

“I couldnt hear it properly.”

A louder chorus of ‘yes’ followed.

“Great. प्रतिभा खुश हुई  (Pratibha is happy)”

“हम भी खुश हुए  (we are happy too.)”

“Ok, grandma’s and grandpa’s…”

All started laughing.
“Sorry, sorry, I mean ‘uncles and aunts’. What shall we do now?”

“Let us sing songs.” All said in one voice.

Time started flying with songs. Hindi and Marathi, devotional songs, film songs, songs of black and white people, catchy current songs all types were sung.

One granny sung, ‘’नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या हैl

(Hindi song from movie) Nanhe munne bachche teri mutthi main kya hai…

Sanjivani said,

“Today is children’s day, you have selected an apt song.”

“Let’s put our hands together for that.” And there was a huge applause.

“We have got another definition of old age- ald age is ‘second childhood’. Yes?”

A big choru of ‘yes’ followed.

One uncle said,

“A big hand for that.”

“Uncle, are you imitating me?” I asked.

All laughed.

“For this a big…”

All clapped loudly on that!

I did something important then. I closely observed them all.

Some of them participated immediately and easily. They were happily clapping, sitting on the chairs and swinging.

Some were singing with reservations, like close-fisted, groping for the reactions of others.

Some were hard nuts to crack!

Some sat in their rooms but enjoyed all the same.

Some sat in their rooms and exhibited a completely detached attitude.

All in all, what was the outcome of this first visit?

I felt very happy and contended. I also firmly decided that I am going to continue with this- not for anything else but for myself. I gave it a lot of thought and came up with a 10 point programme.

The name was- “welcome back जिंदगी”.

Through this programme

  • I wanted to give them a dignified life
  • Whereby they will neve think of themselves as helpless till the end of life,
  • Whereby they will not consider themselves to be defenceless and
  • Most important is they will spend every moment of their life in happiness, peace and contentment.

The 10 fold programme

  1. There should be somebody to listen to them. (Active Listening or reflective listening)
  2. To make them feel that they are very much wanted.
  3. To make them feel they are an important and useful part of the society.
  4. To give them touch therapy.
  5. Give them a positive physical and mental energy.
  6. Attracting and engrossing them in their hobbies.
  7. Make them enjoy their old memories.
  8. To look after their diet.
  9. To become a bridge between their children and them.
  10. Initiate them to write.

Form this moment a new relationship was established between us through these 10 points. I have put aside one day- that too only two hours- a week for them.

Its now two and a half months since I began this programme and now I can say this-

  • It’s an art to look after senior citizens and it gives you a lot of joy and satisfaction. Everbody has to learn it. The reason? Quite obvious. We all will be traveling on the same path soon. And- though we may not accept it right now- we will be expecting the same from the next generation. Then why not teach this to the next generation through our behavior now?

Welcome back जिंदगी should become a movement. Senior citizens’ home should be a prestige point of our society and the responsibility lies with us all.

Do you want to join?

I expect only some time from you.

How much?

As much as is possible for you. Even two hours a week will be sufficient.

Let us now make the senior citizens a respected and dignified part of our life.

Pratibha 

(Translation is done by my friend)


बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट करायची मनात होती. पण त्याला मूर्त स्वरूप येत नव्हत. एका घराची गोष्ट हे पुस्तक लिहून सात वर्ष झाली होती. त्यांत ज्या वृद्धाश्रमाची मांडणी केली आहे तसं वृद्धाश्रम अस्तित्वात असाव अशीच माझी इच्छा आहे पण मी ज्या माझ्या मनातल्या वृद्धाश्रमाची शिल्पकार आहे तर तसं ते प्रत्यक्षात असण्यासाठी माझी मेहनत कुठेच दिसत नव्हती. नुसतच कागदावर त्याच स्वरूप मांडून मी गप्प बसले होते. आणि एक सुंदर पुस्तक निर्मितीचा जो मान मला समाजाने दिला तो घेऊन मी स्वत:ला धन्य मानत होते. काय करायला हव? हा विचार चालू होता पण मार्ग दिसत नव्हता. कदाचित मार्ग मला काढायचाच नव्हता. सदया वेळ नाही अस म्हणत मी चालढकल करत होते. आणि खडबडून जागी झाले जेव्हा एका मित्राने प्रश्न विचारला.

“कस काय बुवा तुला सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो”

“इच्छा असेल तर वेळ नाही ही नुसती सबब असते. मला आवडणाऱ्या गोष्टी करायला भरपूर वेळ असतो”

अस म्हटल्यावर मला आठवण झाली ती माझ्या कल्पनेतला वृद्धाश्रम प्रत्यक्षात आणण्याची.

त्या क्षणी मी जागी झाले.

“ठरलं तर कामाला लागायचं.

सर्व प्रथम वृद्धाश्रमाला दुसरा शब्द शोधायला हवा अशी जागा जिथे वृद्ध मंडळी आनंदाने, मानाने आणि हक्काने निवास करतील. जिथे त्याचं व्यक्तिमत्व जपत त्यांना सन्मानाने वागवलं पाहिजे. त्ती जागा त्याचं घर व्हायला हवं. वृद्धाश्रम म्हटलं की काहीवेळा आश्रिताची भावना मनात येते. कारण आश्रम म्हणजे आश्रयाला आलेला. ही मंडळी आता वृद्ध झाली म्हणजे कोणाच्यातरी आश्रयाला आली अस अजिबात असता कामा नये. अशी जागा जिथे त्यांना आनंदाने आणि हक्काने राहता येईल अशी जागा, म्हणजे?… येस, इंग्लिश मध्ये योग्य शब्द  सिनिअर सिटीझन होम. मग मराठीत काय म्हणू या? जेष्ठ नागरिक निवास.

ग्रेट आता ठरलं तर यापुढे ‘जेष्ठ नागरिक निवास’ म्हणायचं.

दिवस होता १४ नोव्हेंबर २०१७

वेळ सकाळी ११

स्थळ: मधुर भाव

१४ नोव्हेंबर २०१७ सकाळ ११

माझी मैत्रीण डॉ. संजीवनी राहणे या कामामध्ये माझ्याबरोबर आहे.

“गुड मोर्निंग” मी माझी सगळी energy एकवटून म्हटलं.

माझ्या गुड मोर्निंग ला उत्तर आल

“गुड मोर्निंग’

पण आवाजात दम नव्हता. साशंकता होती,

कोण आहे ही?

एका आजीने प्रश्न विचारला

“तुम्हाला इथे कोणी पाठवलं?”
“कोणी नाही. माझी मीच आले.” मी म्हटलं.

“नाही म्हणजे अस कोणी येत नाही, एखाद्या संस्थेने?”

“नाही आजी, मला यायचंय म्हणून मी आले”

“का?”

आता का? काय उत्तर देऊ?

“मावशी,  मी प्रतिभा, मला इथे येऊन तुमच्यशी गप्पा मारायच्या आहेत म्हणून मी दर मंगळवारी येणार आहे. तुम्हाला आवडेल का? आपण गप्पा मारू, गाणी म्हणू”

“बघू”

हे उत्तर मिळाल्यावर मला लहान मुलाची आठवण झाली म्हातारपण म्हणजे दुसर बालपण म्हणत्तात ते का? हे मला शोधायचं होत.

आम्ही सर्व जण गोल करून बसलो. १६-१७ आजी आजोबा. काहीजण खोलीच्या बाहेर आले नाहीत, एका आजीच्या खोलीत जाऊन मी म्हटलं

“मावशी, बाहेर येता का? आपण सर्व जण मिळून गाणी म्हणू या”

यावर एक नाही दोन नाही, बाईसाहेबांनी जणू माझं अस्तित्वच नाकारलं.

मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं

“आज यावस नाही वाटतंय का? बरं मग पुढच्या वेळी या”

काही जण आले नसले तरी जे आले ते खूप उत्साहात होते. त्यांनी एका घराची गोष्ट पुस्तक वाचलं होतं आणि आता आपलं हे घर आहे हे स्वीकारलंही होत.

“मादाम…”

“माझं नाव मादाम नाही. माझ्या आई-वडिलांनी हौसेने ‘प्रतिभा’ अस नाव ठेवलं आहे. तुम्हा सर्वांना मला नावाने हाक मारायला आवडेल का?”

“पण…”

“मला फार आवडेल तुम्ही असं केलत तर”

“मग नक्की तुला नावाने हाक मारू. ए प्रतिभा?”

“ऑफकोर्स. ए च म्हणायचं. मी लहान आहे नं तुमच्यापेक्षा.”

“खूप लहान आहेस”

“नाही हं. मी सिनिअर सिटीझन आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. म्हातारपणाची माझी व्याख्या काय माहित आहे का?”

“काय?”

“अनुभवाने आलेलं शहाणपण म्हणजे म्हातारपण”

“पण असं आपली मुलं नाही मानत. ते म्हणतात, तुम्हाला काय कळतंय? आता तुम्ही म्हातारे झालात आणि मग इकडे आणून टाकतात.” एकजण म्हणाले

“मुलांनी नाही मानलं तर तो त्यांचा प्रश्न. आपण मानतोय ना ते महत्वाचं. आपल्याला काय वाटतंय हे आपण मानायचं.” मी म्हटलं

“हे मला पटलं” एक आजी म्हणाल्या.

“आजी, मला सांगा आयुष्यात दुसऱ्यांना काय वाटतय हे बघायला आपल्याला वेळ आहे का? कित्ती गोष्टी करायच्या बाकी आहेत, गाणी गायची आहेत त्यावर डान्स करायचाय, आता यापुढे फक्त आनंद हवा आपल्याला. बरोबर?” मी त्यांना न्याहाळत होते.

“अगदी बरोबर” कोरस

“अरे, मग इस बात पर टाळ्या वाजवूया.” मी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

सगळ्यांनी भरपूर उत्साहात टाळ्या वाजवल्या.

“तर मंडळी, ठरलं आपल, यापुढे कोणाला काय म्हणायाचय ते म्हणू दे, कोणाला कसं वागायचं ते वागू दे, आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही आनंदात राहणार. ठरलं नं आपलं?”

“हो” कोरस

“छे: मला नाही ऐकू आलं”

“होssss” सगळ्यांनी म्हटलं.

“वा: प्रतिभा खुश हुवी”

“हम भी खुश हुवे”

“ओके, आजी आणि आजोबांनो,…”

सगळेजण हसायला लागले

‘सॉरी सॉरी, मावशांनो आणि काकांनो.. आत्ता काय करायचं.”

“गाणी म्हणायची.” कोरस

“ओके…”

आणि मग एक तास कसा गेला ते कळल नाही. हिंदी मराठी अभंग, श्लोक, उडती गाणी. सगळी black and white मंडळींची गाणी, टपोरी गाणी असे सगळे प्रकार झाले. एका आजीने

“नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या हैं” हे गाण म्हटलं.

संजीवनी म्हणाली

“वा: आज बालदिनाच्या दिवशी मावशींनी मस्त गाण निवडलं.

“इस बात पे जोरदार टाळ्या” सगळ्यांनी लगेच ऐकलं.

“अरे वा, आज म्हातारपणाची अजून एक व्याख्या आपल्याला मिळाली. म्हातारपण म्हणजे दुसर बालपण, येस?”

“येस,” कोरस

एक काका म्हणाले,

“इस बात पे टाळ्या”

“काका माझी नक्कल करता का?” मी लटक्या रागाने म्हटलं.

सगळ्यांना हसायला आलं.

“इस बात पे…..”

याच उत्तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून दिल.

मी या वेळी एक महत्वाच काम केल. सगळ्यांना न्याहाळण्याच.

  • काहीजणांनी लगेच भाग घेतला, मनापासून टाळ्या वाजवत खुर्चीत बसून डोलत होती
  • काहीजण हातच राखून दुसऱ्यांचा अंदाज घेत गाणी म्हणत होते
  • काहीजण म्हणजे hard nut to crack
  • काही खोलीत बसून आनंद घेत होते
  • काही खोलीत बसून आपला याच्याशी काही सबंध अस वागतं होते.

पण एकंदरीत गोळाबेरीज बघता पहिल्या भेटीतून काय निष्पन्न झाल?

मला खूप आनंद वाटला, समाधान वाटलं, आणि हे सर्व यापुढे मी माझ्या साठी करणार आहे मी पक्क ठरवलं आणि बऱ्याच विचारातून एक दहा सूत्री कार्यक्रम ठरवला. त्या कार्यक्रमांच नाव,

“welcome back जिंदगी”.

या कार्यक्रमातून मला त्यांना द्यायचं होत.

‘एक dignified आयुष्य’ एक अस आयुष्य ज्यात ते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत स्वत:ला असहाय समजणार नाहीत, लाचार समजणार नाहीत आणि आनंदात, समाधानात, शांतपणे आयुष्य जगतील.

“welcome back जिंदगीदहा सूत्री कार्यक्रम

  1. त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकण (Active Listening or reflective listening)
  2. त्यांना याची जाणीव द्यायची की तेही कोणीतरी महत्वाचे आहेत
  3. त्यांना हे जाणवायला हव की ते आपल्याला हवे आहेत
  4. स्पर्शाने त्यांच्याशी संवाद साधण
  5. त्यांना शारीरिक मानसिक उर्जा देणं
  6. त्यांच्या छंदांमध्ये त्यांना त्यांना रमवणं
  7. त्यांना त्यांच्या जुन्या आठवणीं मध्ये रमवणं
  8. त्यांच्या खाण्याकडे लक्ष देण
  9. त्यांच्या आणि त्यांच्या मुलां मधील दुवा होणं
  10. त्यांना लिहायला मदत करणं

आणि मग त्या दिवसा पासून या दहा सूत्रातून माझं त्यांच्याशी एक नवीन नातं निर्माण झालं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आठवड्यातला एक दिवस त्यांना देते आणि तो ही फक्त २ तास.

आज या उपक्रमाला अडीच महिने झाले आणि आता मला म्हणावस वाटतं,

जेष्ठ नागरिकांची काळजी घेण ही एक कला आहे जी तुम्हाला खूप संधान आणि आनंद देते आणि ती प्रत्येकाने शिकली पाहिजे कारण? कारण स्पष्ट आहे. आपणही लवकर त्या मार्गावरून चालणार आहोत आणि आपली आपल्या पिढी कडून हीच अपेक्षा असेल आता कितीही अमान्य केली तरीही तर मग आपण आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीला हे शिकावूया का

Welcome back जिंदगी ही एक चळवळ (movement) झाली पाहिजे, जेष्ठ नागरिक निवास हा समाजाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांवर आहे.

तुम्हाला या चळवळी मध्ये यायचंय?

मला फक्त हवाय तुमचा वेळ, किती? तुम्हाला असेल तेव्हढा.

अगदी आठवड्याला दोन तास सुद्धा पुरेल,

चला तर मग

आपल्या जेष्ठांना आपण सन्मानाने वागवूया 

आणि 

आदराने आपल्या जीवनाचा एक भाग करू या.

प्रतिभा

Welcome ज़िंदगी – 4

This slideshow requires JavaScript.

This article is dedicated to my Mother, Father and Uncle 

They introduced a thought to me.

I am sharing it with you today.  

Have we lived life to the fullest?

Perhaps the answer is NO.

A lot of things are yet to be completed.

Something important is yet to be told?

Haven’t listened to someone properly?

Some promise is not fulfilled?

Haven’t yet told someone that he/ she is an important person in our life?

Meeting someone with a big hug

Inviting someone, helping someone is yet to be done?

Want to ask for forgiveness and want to forgive someone?

Also, thanking someone, remembering someone,

Touching someone

 Is yet to be done?

Not yet loved someone wholeheartedly

Leaving behind anger, greed, temptation and jealousy?

Deleting some painful memories

Haven’t yet recalled some joyous moments in life?

And wiping someone’s tears?

Helping someone in forgetting sorrow?

What about being the pillar of strength for someone to lean on?

Brought a smile to someone with our laughter?

And

So many wonderful and enjoyable things we may not have done so far like

Splashing colors on a huge canvas to our heart’s content

To sing in an open voice, however rough.

An unwritten story?

                                                               An unwritten poem?

Want to wander in nature being one with her?

(We have almost forgotten to take care of her!)

Want to watch the sea for hours together

And

Fill our eyes with the beauty?

Haven’t yet done stargazing on a thrilling night?

The list is open-ended!

A treasure of happiness is going to glide into our hands.

 Begin NOW before it is too late.

Have a subtle feel and awareness of life.

We are living the length of life,

Now it is time to add breadth and height

And then we can say,

YES, WE LIVED OUR LIFE TO THE FULLEST

Now that we have taken a vow of joy

And decided to ‘Welcome जिंदगी’

Let us not waste time any more.

Let us not retreat

Because

The distance between one’s being and not being in life is

Only that of a breath!

Pratibha

(Translation is done by my friend)


This article is dedicated to my Mother, Father and Uncle 

They introduced a thought to me.

I am sharing it with you today.  

उशीरच झालाय बऱ्याच गोष्टींना

खूप काही राहिलंय का करायचं?

महत्वाच सांगायचं राहिलंय, कोणाच तरी ऐकायचं राहिलंय

दिलेलं वचन पूर्ण करायचंय,

कोणाला तरी भेटायचंय, कोणाला तरी बोलवायचं

कोणाला मदत करायची आहे

कोणाची माफी मागायची आहे, कोणाला तरी माफही करायचं राहिलय

कोणाचे आभार मानायचेत

कोणाला आठवायचय, कोणाला स्पर्श करायचाय

 कोणाचे अश्रू पुसायचेत, कोणाची काठी व्हायचंय

आणि

राग लोभ मोह मद मत्सर या सर्वांना मागे टाकून

भरभरून प्रेम करायचंही राहूनच गेलंय

तुम्ही माझ्या आयुष्यातली महत्वाची व्यक्ती आहात हेही सांगायचंच राहिलच आहे.

काही दुख:दायक प्रसंग स्मृतीतून कायमचे पुसायचेत

आनंदाचे सुंदर क्षण आठवायचेत

आपल्या हास्याने कोणाच्या तरी चेहेऱ्यावर हसू आणायचय

कितीतरी मजेशीर गोष्टीही राहूनच गेल्यात करायच्या

मोठ्या कॅनव्हास वर मनसोक्त रंगांची उधळण

भसाड्या आवाजात मोठ्ठी तान

बरच लिहायचही राहिलंय

कविता सुचात्येय पण राहुनच गेली लिहायची

समुद्राला डोळ्यात साठवत तासनतास न्याहाळायच

धुंद रात्री चमचमत्या चांदण्या न्याहाळायच्याही राहूनच गेल्यात

 निसर्गात स्वत:ला विसरून फिरायचंय

त्याची काळजी घ्यायची तर विसरलोच आहोत बहुतेक

यादी कितीही मोठी होऊ शकेल आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असेल.

प्रत्येकालाच वाटत असेल,

खूप खूप बाकी आहे अजून

आयुष्य अपूर पडेल कदाचित म्हणून सुरुवात आत्ताच,

राहून जातंय की काय ही भीती अनाठाई आहे

करून तर बघा,

मग आनंदाचा ठेवा अलगद हातात येऊन बसेल

हलकासा स्पर्श जीवनाचा

हलकीशी जाणीव आयुष्याबद्दलची

लांबी जगतोच आहोत आता हवी रुंदी आणि उंची

आणि

मग फिकीर नाही आयुष्याच्याच्या त्रीमितीची

आता वेळ नाही दवडायचा

आपण व्रत घेतलंय आनंदाच तर आता मागे नाही हटायचं

म्हणुनच हीच ती वेळ हाच तो क्षण

कारण कोणाचही असणं आणि नसणं

यांत अंतर आहे फक्त एका श्वासाचं

प्रतिभा

***

Welcome ज़िंदगी – 3

बाळकाका १slide4.1.001

This article is dedicated to my uncle, Mr. Vishnu Gadgil. For us he was our  ‘बाळकाका’. On 19th Jan. 2018 at the age of 90 he breathed his last. 

With a jovial and friendly personality he was always a support to me and my brother. He was single and lived with my father. After the sad demise of father in 1990, he moved to Pune to stay with me and my family for 25 years. Last the past 2 years he preferred to stay in Mumbai where my brother Prakash took very good care of him. 

बाळकाका” We miss you.


Psychological First Aid

First aid is given to physical wounds. Emotional hurts too require psychological first aid. Many times we provide that unknowingly. The best example would be when a baby slips and falls on the floor we hit the floor and say,

“Damn you, why have you hurt my baby?” And then the baby starts smiling.

Many times we take it upon ourselves to help recover our dear ones from some ordeal. We think that our words and advice will reduce or wipe out their sorrow, things will be alright and they will feel good once again. So we offer unasked for or unnecessary and verbose advice. Mostly these turn out to be empty words because the recipient is not in the proper frame of mind to take them in.

It is the most tragic incident when someone loses a dear one. If you offer condolences with inappropriate words…

It happened last week. I went to meet a friend only a few hours after she lost her husband. His body was still in the house and somebody was telling her,

“Forget all the sorrow now, you have suffered a lot; now live for yourself.”

A numbing incident and inappropriate condolences!

 

There is no doubt that our intentions are good. But many times that person needs just being with you more than your words and advice. An affectionate touch speaks a lot more than words do. Or, many times it is necessary only to listen to whatever he/ she is saying. If this is an ‘active listening’ it certainly helps as a psychological first aid.

Friends, relatives, family members and colleagues should understand what the person actually needs in similar situations so that you can decide what is to be done to lessen that person’s pain.

My frank opinion is that children understand these things better than adults. Here is the best example of it from Boston, America.

John was eight years old. An elderly couple stayed in front of his house. John visited them very often; he was ‘at home’ in their house. They were like his grandparents.

The grandmother passed away and the next day, taking John along, John’s mother went to their house to offer condolences. A number of relatives had gathered; the grandfather sat on a chair outside the house and wept silently. As John looked at him, he left his mother’s hand and placing his tiny hand into grandfather’s hand sat in the grandfather’s lap. His mother went inside the house and talked to other family members. John just sat in the grandfather’s lap quietly.

As his mother came out John gently placed his lips on grandfather’s hand, got down and holding his mother’s hand returned home. Usually he used to chatter with the grandfather but today he preferred to be quiet.

Then his mother asked him,

“John, what did you talk to him when you were in his lap?”

“Mom, I said nothing. I just helped him cry.”

This was the reply of an eight year old!

He had realized that the grandfather did not need words at this moment; 

The need was to join in his sorrow 

And 

To listen to his silent weeping by observing silence.

Shall we follow him?

Pratibha.

(Translation is done by my friend)
—————————————————————————————————————————————–

मानसिक प्रथमोपचार
(Psychological First Aid)

ज्याप्रमाणे शरीरावर आघात झाला की आपण प्रथमोपचार करतो त्याच प्रमाणे मनाला जबरदस्त आघात झाला की मानसिक प्रथमोपचार करण जरुरीच असत. आणि आपण ते आपल्या न कळत करतही असतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे, लहान मुलं पडल की आपण जमिनीला मारून म्हणतो,

“हातरे, पाडलस का आमच्या बाळाला.” आणि मग ते बाळ हसायला लागतं.

कित्येक वेळा आपल्या प्रिय माणसांना धक्क्यातून सावरण्याचीजबाबदारी आपलीच आहे असे समजून आपण असे प्रयन्त करतो की निव्वळ आपल्या शब्दाने किंवा सल्ल्याने समोरच्याच दुख: कमी होईल किंवा नाहीस होईल आणि त्याला लगेच बर वाटून सगळ ओके होईल आणि मग त्यावेळी गरज नसलेले सल्ले किंवा शब्द बंबाळ उपदेश आपण करतो. कित्येक वेळा हे शब्द नुसते पोकळ वाटतात कारण घेणारा त्या मन:स्थितीत नसतो.

प्रिय माणसाच निधन ही आपल्या आयुष्यातली अत्यंत दुख:दायक घटना आणि त्यावेळी भेटायला येणाऱ्या माणसाने जर सांत्वन करताना चुकीचे शब्द वापरले तर…

गेल्या आठवड्यातली गोष्ट. ओळखीच्या घरी दुखवटयाला जायची वेळ आली. अजून त्या माणसाला शेवटच्या प्रवासाला नेलही नव्हत आणि एक जण त्यांच्या बायकोला सांगत होती,

“विसरा आत्ता दुख:, खूप सोसलत. आता स्वत:साठी जगा”

सुन्न करणारी घटना आणि प्रसंगाला साजेस नसणार सांत्वन.

अर्थात हे आपण चांगल्याच भावनेने करतो यात शंका नाही. पण बऱ्याचदा या सल्ल्या पेक्षा, शब्दां पेक्षाही त्या माणसाला फक्त आपण जवळ असण्याची गरज असते.Just being together. काही वेळा मायेचा स्पर्श बरच काही सांगून जातो. खूप वेळा त्या माणसाच ऐकून घेण्याची गरज असते. आणि हे ऐकण्याची पद्दत जर Active listening या स्परूपात असली तर त्याचा मानसिक प्रथमोपचारासाठी नक्कीच उपयोग होतो.

मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबाचे सदस्य आणि सहकारी यांनी हे समजून घ्यायला हव की अश्या वेळी आपल्या माणसाला कशाची गरज आहे म्हणजे त्रास कमीतकमी करण्यासाठी काय काळजी घ्यायची हे ठरवता येईल.

लहान मुलांना बऱ्याच गोष्टी आपल्या मोठ्या माणसांपेक्षा जास्त कळतात अस माझं स्पष्ट मत आहे. आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतल्या बोस्टन शहरातली गोष्ट

जॉन आठ वर्षाचा मुलगा. त्याच्या घरासमोर राहणार एक वयस्कर जोडप. जॉनच त्या घरी खूप जाणं-येणं. जणू त्याचे स्वत:चे आजी आणि आजोबा.

आजींच काल निधन झाल म्हणून जॉनची आई त्यांच्या सांत्वनाला छोट्या जॉनला घेऊन गेली. घरात बरेच नातलग जमले होते. आजोबा मूकपणे अश्रू ढाळत घरा बाहेर एका खुर्चीवर बसले होते त्यांना बघतच जॉनने आपल्या आईचा हात सोडला आणि तो आजोबांच्या मांडीत जाऊन बसला. आपला चिमुकला हात त्याने आजोबांच्या हातात दिला. त्याची आई घरातल्या सर्वांना भेटून बाहेर आली तरीही जॉन आजोबांच्या मांडीत होता.

आईलाबाहेर आलेले बघितल्यावर त्यानेहळूच आपले ओठ आजोबांच्या हातावर टेकवले आणि खाली उतरून आपल्या आईचा हात धरून तो घरी आला. आजोबांशी खरतर एरवी त्याची खूप बडबड चालायची पण आजत्याने मूक राहण पसंत केल होत.

घरी आल्यावर आईने त्याला विचारले,

“जॉन, तू त्यांच्या मांडीत बसून त्यांच्याशी काय बोललास?”

“Mom, I said nothing. I just help him cry

आठ वर्षाच्या मुलाला हे कळलं होत की
आज आजोबांना शब्दांची गरज नाहीये.
गरज आहे ती त्यांच्या दुखा: सामील होऊन त्याचं मूक रुदन ऐकण्याची.

आपण करूया का त्याच अनुकरण?

प्रतिभा

Welcome ज़िंदगी – २

Screen Shot 2018-01-11 at 9.39.25 PM

Now that you want to live fully in all the three dimensions, in the best possible way, let us first think about the first dimension i.e. length of life.

We have to know what we think about life and about ourselves.

Here is a ‘life tree’ that will help us know what we think about ourselves.

I have gathered from my clients what they think about themselves. Here I cite three life trees as examples.

Life Tree

Roots: All that we think we are born with.

Stem/ branch/ twig: The utilization of all that we are born with.

Leaves: Various influences in our life.

Fruits: Your achievements/ successful completion of work.

Fallen Fruits: Missed opportunities in our life.

Nest: People we support/ have supported.

Threats: Blustering storms in life.

Shedding of Leaves: Things we want to discard.

Thorns: our shortcomings, things within us that prick us.

Once, a couple brought their five year old son to me for counseling. They were complaining,

“He keeps playing all the time; he doesn’t like to study, eat or sleep.”

I was about to laugh and said,

“If possible I would love to do just that!”

Leave the joke aside and listen to what the boy said about himself-

1. Life Tree of a five year old boy

Roots: I am born in a house where there are a lot of toys.

Stem/ branch/ twig: I play a lot with those toys.

Leaves: My naughty friend has influenced me to a great extent (that is what my parents say.)

Fruits: I am number 1 in everything.

Fallen Fruits: Out of the 24 hours of a day, I am allowed to play only for 5 hours; I have lost the opportunity to play for the remaining 19 hours.

Nest:  Many friends, when I am playing with them.

Threats: Parents, and teachers in the school.

Shedding of Leaves:  Studies.

Thorns: I have no thorns. I am the best the way I am.

2. Life Tree of A man

A man who is successful in career
But thinks that the success is brought about
Only by his efforts

Roots: My intelligence.

Stem/ branch/ twig: I became an engineer and now work on a very high post.

Leaves: Very few. I believe in my own abilities.

Fruits: I am the CEO of an international company at the age of 35.

Fallen Fruits: I am intelligent but my parents didn’t have sufficient funds to send me abroad for further education. I have lost that opportunity.

Nest:  A number of people.

Threats: A lot.

Shedding of Leaves:  None.

Thorns: Others say that I am egoistic. That is not true; these words come out of their jealousy of my accomplishments.

3. Life tree of a man who has excellent spiritual competence 
And is successful in life

Roots: A good, life in comfort. Good values from parents, grandparents. Sound mental condition

Stem: Have tried to live up to what I inherited by being a good human being.

Leaves: My parents, uncles and aunts, my school, in-laws, good friends. In fact all the people who came in my life.

Fruits: I tried to perform my job well and tried to help those whom I have met on my way. I think I have done fairly good work/

Fallen Fruits: Nothing much really. I believe in flowing like a river and moving on. What I may have missed, was never really meant to be mine.

Nest: The students that I have interacted with from my teaching days in college to present day distance learners. Many people afflicted with Cancer who seek some support and solace while undergoing treatment and their caretakers too.

Threats: None. And I don’t really care much. At this stage in life I can’t think of anyone or anything who is or that is a threat to me.

Shading of Leaves: Can’t think of anything. Everything is very much a part of me.

Thorns: That I am rude and blunt. I raise my voice. I am obstinate and stubborn.

“To know yourself is the first step towards self-knowledge.”- Aristotle.
When we think of becoming our own friend we realize that
No relation, except my relation with myself, lasts from birth till death.
Parents go away after a while.
Partner and children enter our life at a late stage.
Friends come and go.
But the relation that I have with myself is life-long.
That is why it is it is very important to preserve it, cherish it.

Pratibha

(Translation is done by my friend)


आयुष्याची त्रिमिती उत्तम रीतीने जगायची असेल तर पहिल्यांदी विचार लांबीचा.

आपल्याला हे माहित हवं की आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतं? आणि त्यासाठी जीवनाच झाडं.

माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या लोकांकडून या बद्दल जाणून घेतलं की लक्षात येत की स्वत:बद्दल त्यांना काय वाटतं.

“जीवनाच झाड”

मूळ: आपण काय घेऊन जन्माला आलो आहोत असं तुम्हाला वाटतं.

देठ, डहाळी, फांदी: आपल्याला जे जन्मजात मिळालं आहे, त्याचा आपण कसा उपयोग केला आहे.

पाने: तुमच्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव पडला आहे?

फळं: कुठल्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

अर्धवट गळून गेलेली फळं: आपण आयुष्यातील गमावलेल्या संधी

घरटं: तुम्ही कोणाला मदत केली आहे का?

धोके: घोंगावणारी वादळं,

गळून गेलेली पानं: आपल्याला आपल्या ज्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत.

काटे: तुम्हाला तुमच्या बोचणाऱ्या गोष्टी. दोष, तुम्हाला दुर्बळ करणाऱ्या गोष्टी अश्या गोष्टी ज्या इतर लोक तुम्हाला सांगत आहेत.

एक पाच वर्षाच्या मुलाला घेऊन त्याचे आई-बाबा समुपदेशना साठी आले होते. त्यांची एक तक्रार होती,

“हा सारखा खेळतो, अभ्यास, खाण, झोप याला आवडत नाही.”

मला तर हसूच आलं, मी म्हटलं,

‘शक्य असतं तर मलाही फक्त खेळायला आवडलं असतं”

विनोद सोडून देऊया पण तो मुलगा स्वत:बद्दल काय म्हणतो,

1 पाच वर्षाच्या मुलाच झाडं

मूळ: मी खूप खेळणी असलेल्या घरात जन्माला आलो

देठ, डहाळी, फांदी: मी त्या खेळण्याशी खूप खेळतो

पाने: माझा मित्र जो खूप खोड्या करतो त्याचा माझ्यावर प्रभाव पडला आहे (अस आई-बाबा म्हणतात)

फळं: सगळ्याच गोष्टीत मी नं.वन असतो

अर्धवट गळून गेलेली फळं: चोवीस तासा पैकी मला फक्त ५ तास खेळायची परवानगी आहे उरलेले एकोणीस तास मी खेळायची संधी गमावलेली असते.

घरटं: शंभर मित्रांना, खेळताना

धोके: आई-बाबा, शाळेतले टीचर

गळून गेलेली पानं: अभ्यास

काटे: मला काटे नाहीत. मी जसा आहे तसा बेस्ट आहे.

2. करिअर मध्ये यशस्वी असणाऱ्या पण हे कर्तुत्व फक्त स्वत:च आहे
अस समजणाऱ्या माणसाने लिहीलं,

मूळ: माझी बुद्धिमत्ता

देठ, डहाळी, फांदी: मी इंजिनिअर झालो आज एका मोठ्या पदावर काम करतो

पाने: फारसा कुणाचा नाही. मी स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतो

फळं: पस्तिसाव्या वर्षी मी आंतरराष्ट्रीय कंपनीचा CEO आहे

अर्धवट गळून गेलेली फळं: मी खूप हुशार आहे पण आई-बाबांकडे मला परदेशी पाठवायला पैसे नव्हते म्हणून परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची संधी मला गमवायला लागली.

घरटं: बऱ्याच जणांना

धोके: बरेच

गळून गेलेली पानं: काहीच नाही

काटे: लोक म्हणतात मी खूप गर्विष्ठ आहे पण ते खरं नाही. मी कर्तुत्ववान असल्यामुळे माझ्यावर लोक जळतात.

3. अध्यात्मिक आणि तो जीवनातही यशस्वी आहे असा माणूस आपल्या आयुष्याकडे कसं बघतो?

मूळ: चांगले, आरामदायी आयुष्य. आई-वडील, आजी-आजोबांकडून उत्तम संस्कार आणि मूल्य.

देठ: त्या मूल्यांनुसार एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला

पाने: आई-वडील, इतर नातेवाईक, माझी शाळा, सासू-सासरे, मित्र-मैत्रिणी, खरं तर माझ्या आयुष्यात आलेले सर्व जण

फळे: मी माझे काम उत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि मला भेटलेल्यांना मदतही केली. माझ्या मते मी माझ काम व्यवस्थित केल

गळून गेलेली फळे: फारशी नाहीत, नदी प्रमाणे प्रवाही राहून पुढे जावे असं मला वाटतं जे निसटून गेले, मला मिळाले नाही ते माझ्यासाठी नव्हतेच.

घरटे: महाविद्यालयात मी शिकवत असताना, विद्यार्थ्या बरोबर संवाद, कॅन्सरवर उपचार घेताना पाठबळ आणि दिलासा शोधणारे रुग्ण

धोके: फारसे नाहीत. असतील तरी मला त्याची फारशी फिकीर नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर मला कोणाकडून धोका आहे अस वाटत नाही

गळून गेलेली पाने: नाही आठवत. मी कधी याचा विचार नाही केला

काटे: मी उद्धट आणि रोख-ठोक आहे, उच्च स्वरात बोलते, हट्टी आहे अस काहीजण म्हणतात.

“स्वत:ला ओळखणं ही शहाणपणाची पहिली पायरी आहे” –अॅरिस्टॉटल
स्वतःला मित्र करायचा विचार आपण केला
तर पटेल की
दुसर कुठलही नात हे आपल्या जन्मापासून, मृत्युपर्यंत नसत.
आई, वडील कालांतराने आपल्या आयुष्यातून जातात,
जोडीदार, मुल, आपल्या आयुष्यात उशीरा येतात.
मित्र, मैत्रिणी काही काळ येतात, जातात
पण स्वतःच स्वतःशी नात हे जन्मभराच असत.
म्हणून हे नातं जपण महत्वाच ठरतं

प्रतिभा

 

Welcome ज़िंदगी – Story 1

slide3

3 dimensions of life

Want to welcome zindagi? Then we have to live life to the fullest. A new thought about life can enter the mind only when the mind is set free. It actually happened the other day. I came across a beautiful thought and felt that this is a good beginning to welcome zindagi.

I place the thought before you now.

What is this new thought?

It means to measure the span of life.

How?

When it comes to an object, we calculate its volume with a simple equation

Volume = length X breadth X height (tallness)

Similarly we can calculate the volume, the extensiveness of our life with these three dimensions. Taking into account these three and living life to the hilt is to welcome zindagi.

Length of life

The distance between birth and death is the length of life.

First and foremost learn to think about ourselves, learn to love ourselves.Self-development and self-good means the length of life because of which you can reach our goal and fulfill our ambitions.

Let us ask ourselves a question,

Should we accept life as it is?

Or,

Should we try to live the way we want to live?

Some people get entangled in emotional conflicts and sink down in an emotional abyss, feel helpless. Some try to follow and copy their idols, so their ‘self’ is lost. Every human being is unique; therefore, without leaving his own Dharma he should tell himself that his friend and brother is only his ‘self’ and then go ahead. The Bhagavad-Gita also teaches us the same.

It will not be incorrect to say that only when you have a friendly and loving relationship with yourself you can understand your relationships with others from a transcendental point.

In a way this dimension is self-centered and without a healthy self- development we are not in a position to help others adequately. It is necessary to empower yourself for that. What is the purpose of life? What is our destination? What do I want to do with our life? All this we have to decide by ourselves because we are the sculptors of your life.

“Mere Self-development is not authentic living;

It is laying the foundation of living a good and complete life.”

‘WIDTH OF LIFE’

After achieving self-development and reaching the peak of success, what next? Will this provision be sufficient to live a good and complete life? Perhaps not; now we need to have a width to your life. That is, life needs to become wider and wider.  The measure for this is not length + breadth; it is length X breadth.

Some people don’t extend life’s journey beyond the first dimension of length. They are not aware that there are others living on the earth besides them! Their thoughts are only as high as their life. Their thoughts are limited to their lives only. They use others for their own personal benefit. But we must realize that there is a world beyond my world, others also contribute to my prosperity and wellbeing. And, now the time has arrived to acknowledge it.

“For how long should one linger in personal development?

If we want to widen the boundaries the picture of life must become larger.”

More than,

How beautiful I am, how much wealth I have, how big a house do I have, how much successful do I consider myself..

We should ask ourselves,

How wide is my life, do I help others and to what extent, have I brought happiness to others…

Answers to these questions are very important.

Let us try helping the needy in the society and see how much it changes my life.

Tallness of life
Why stop here, let us go beyond the horizon

We are not to stop with length X breadth; think if we add tallness to it how huge the volume will be.

What exactly is it to increase the tallness of life?

It means to have towering thoughts, to become worshippers of beauty.

Here ‘beauty’ is the adjective attributed to thoughts and not to looks. There is no place for anger, greed, arrogance, jealousy, temptation etc. in beautiful thoughts.

What is the meaning of ‘Shiva’ and ‘Parvati’? Who are they? Don’t know! But, surely they are our friends in our inner world.

‘Shiva’ means the desire for the well-being of all which is the width of life and ‘Parvati’ is the tallness of our thought, which has to be as tall as a mountain.

When there is gratitude and forgiveness in mind our thoughts become as high as the mountains.

“Let us go beyond the limits of being man and connect ourselves with the divine dharma.”

When we live with these three dimensions our life will have a wider field and be complete.

Now let there be no regrets, no malice, ill-will about anyone;
Let there be no expectations as well.
Now there is only satisfaction and peace
Let us live a blissful life. 

Pratibha

  • “The Three Dimensions of a Life”

an article by Martin Luther King, JR is a helpful source for this write-up.

  • Inputs from Ravi Paranjape, a great artist, about his distinct thoughts on beauty and Shiv-Parvati”

Thanks Ravi Sir.

Translation is done by my friend


आयुष्याची त्रिमिती

मला जर जिंदगीला welcome करायचं आहे तर आयुष्य भरभरून जगायला हवं. जेव्हा मनाला मुक्त करीन तेव्हाच आयुष्या बद्दलचा एक नवीन विचार मनात येईल.

आणि झालही तसंच. एक छान विचार कळला आणि वाटलं जिंदगीला welcome करायचं असेल तर सुरुवात इथूनच हवी.

आहे तरी काय हा नवीन विचार?
तर आपल्या आयुष्याची व्यापकता मोजायची.
पण कशी?
जस एखाद्या वस्तूची व्यापकता मोजायची असेल तर
आपण त्याच आकारमान बघतो.
आकारमान (volume) = लांबी*रुंदी*उंची
आपल्या आयुष्याच आकारमानही याच त्रिमिती वरून मोजता येईल.
या तिन्ही पैलू मध्ये परिपूर्ण जगण म्हणजे welcome जिंदगी

आयुष्याची लांबी

जन्म आणि मृत्यू या मधील अंतर ‘म्हणजे आपल्या आयुष्याची लांबी.

सर्वप्रथम विचार स्वत:चा, स्वत:वर प्रेम करायला शिकल पाहिजे. स्व-विकास. स्व-कल्याण म्हणजेच आपल्या आयुष्याची लांबी ज्यामुळे स्वत:च ध्येय आणि महत्वाकांक्षा या पर्यंत पोहोचता येईल.

जीवन जस आहे तस स्वीकारायच की
जीवन जस हवय तस जगायचा प्रयत्न करायचा?
असा प्रश्न स्वत:ला विचारुया.”

काही लोक भावनिक संघर्षामध्ये अडकतात, भावनेच्या गर्तेत खोलवर रुतून बसतात, स्वत:ला असहाय समजतात. काही लोक दुसऱ्यांना आदर्श बनवून त्यांच्या सारखाच जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांची नक्कल करतात आणि आपल स्व: हरवून बसतात. प्रत्येक माणूस अद्वितीय आहे त्यामुळे त्याने स्वधर्म न सोडता ठामपणे स्वत:शी म्हणायचं की मी माझा मित्र, बंधू, सखा आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची. श्री मद् भगवत गीतेतही हीच शिकवण आहे.

अस म्हटलं तर चुकीच होणार नाही की स्वत:च स्वत:शी नात हे सेन्ह्पूर्ण असल, प्रेमाच असल तर आणि तरच आपण दुसऱ्या नात्यांकडे परम भावाने बघू शकू.

एका अर्थाने हे परिमाण स्वार्थी आहे. पण निरोगी स्व:कल्याण केल्याशिवाय दुसऱ्यांना समाधानकारक पुरेश्या प्रमाणात आपण मदत करू शकत नाही, त्यासाठी स्वत:ला सक्षम करण गरजेच असत. आपल्या आयुष्याच प्रयोजन काय? मला कुठे पोहोचायचं आहे? माझ्या आयुष्याच काय करायचं? हे आपणच ठरवायचं. कारण आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत.

स्वत:ची प्रगती हे जगण नाही
तो एक उत्तम आणि परिपूर्ण जगण्याचा पाया आहे.” 

आयुष्याची रुंदी

स्व:-विकास झाला, यशाच्या शिखरावर विराजमान झालो, आता पुढे? आयुष्याच्या परिपूर्णतेकडे जाऊ शकू का या पुंजीवर? कदाचित नाही, आता गरज आहे रुंदीची. आणि याच परिमाण लांबी + रुंदी अस नसून लांबी*रुंदी अस आहे.

काहीजण आपला प्रवास पहिल्या म्हणजेच लांबी या पैलूच्या पलीकडे नेत नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्या शिवाय कोणी राहातच नाहीत अस यांना वाटत. स्वत:च विश्व यापलीकडे यांच्या विचारांची उंची नसते. दुसऱ्याही माणसांनाही ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरतात. पण इथे विचार करण्याची गरज आहे की आपल्या पलीकडेही एक जग असत, आपल्या उत्कर्षामध्ये इतरांचाही हात आहे आणि आता वेळ आहे याची जाण ठेवण्याची, हे ऋण फेडण्याची.

वैयक्तित प्रगती मध्ये माणूसाने किती काळ रमावं?
आपल्या कक्षा  रुंदावायाच्या असतील तर आयुष्याच चित्र विशाल करायला हव.”

आपण किती सुंदर आहात, आपल्या कडे किती पैसा आहे? आपण किती मोठ्या घरात राहतो? आपण आपल्याला किती यशस्वी मानतो?

यापेक्षाही

माझ्या आयुष्याची रुंदी किती आहे? मी दुसऱ्यांना किती मदत करतो? किती जणांच्या आयुष्यात माझ्या मुळे आनंद निर्माण झाला आहे?

याची उत्तर मिळणं महत्वाच ठरतं.

समाजातल्या ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करून तर बघुया,

आपल्या आयुष्यात किती फरक पडतो ते.

आयुष्याची उंची’’

इथेच नाही थांबायचं, जायचं आताक्षितिजा पलीकडे

लांबी झाली गुणिले रुंदीही झाली, आता थांबायचं का? अजिबात नाही कारण विचार करा, याला जोड जर उंचीची मिळाली तर आकारमान किती पटीने वाढेल?

पण उंची वाढवायची म्हणजे काय करायचं?

विचारांची उंची वाढवायची,

सुंदरतेच पुजारी व्हायचं

इथे ‘सुंदर’ हे विशेषण दिसण्याला नसून विचारांना आहे. सुंदर विचारांमध्ये राग, लोभ, मद, मत्सर मोह-माया, अपेक्षा यांना स्थान नाही.

शिव-पार्वतीचा अर्थ काय? कोण आहेत हे शिव-पार्वती? देव? माहित नाही

पण हे आपल्या मनातले आपले मित्र आहेत हे निश्चित. शिव म्हणजे आपल्या मनातली कल्याणकारी भावना (आपली रुंदी) पार्वती म्हणजे आपल्या विचारांची उंची. जी पर्वता एव्हढी असायला हवी.

अंगात कृतज्ञता आणि क्षमाशील वृत्ती असली तर विचारांची उंची पर्वता एव्हढी होते.

“मानवतेच्याही पल्याड जाऊन दैवी स्वधर्मी स्वभावाशी आपण स्वत:ला जोडुया”

जेव्हा आपण ही त्रिमिती जगू
तेव्हा आपल जीवन क्षेत्र पूर्ण होईल.
आपण संपूर्ण आयुष्य परिपूर्ण जगू शकू
आता पश्चाताप नाही,
कोणा बद्दलही आकस नाही आणि अपेक्षाही नाही
आहे ते केवळ समाधान,
आणि
परमानंद
चला, तर मग आनंदाने जगू या
येणाऱ्या जिंदगीला welcome करू या “

 

प्रतिभा

  • या लेखासाठी

“The Three Dimensions of a Life”By Martin Luther King, JR या लेखाची मदत घेतली आहे.

  • रवी परांजपे सर, यांचे आभार मला मानायचे आहेत. सुंदरता आणि शिव पार्वती या शब्दांचा निराळा आणि सुंदर अर्थ त्यांनी मला सांगितला